रघुवीर खेडकर यांना पद्मश्री पुरस्कार हा लोककलावंतांचा सन्मान - माजी मंत्री बाळासाहेब थोरात     |      शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख आप्पासाहेब केसेकर यांचे निधन      |      दिलीपराव पुंड यांना मातृशोक     |      उद्धव ठाकरे शिवसेनेचा रणशंखनाद पंचायत समिती जिल्हा परिषद भगव्याखालीच     |      कोण होणार नगराध्यक्ष ? उत्सुकता शिगेला तीन जागांसाठी शांततेत मतदान     |      घुलेवाडी साठवण तलावातील गौन खनिज बाबत महसूल विभागाचे दुर्लक्ष     |      चंदन चोरी पकडली     |      विधानसभेत खोटे बोलणाऱ्या खताळांविरुद्ध तक्रार दाखल करणार खोटे व्हिडिओ आणि फ्लेक्सबाजी शिवाय वर्षातील एक तरी काम दाखवा     |      आ.सत्यजित तांबे यांच्या पाठपुराव्यातून बिबट्याच्या हल्ल्यातील मयत सिद्धेश कडलगच्या कुटुंबीयांना 10 लाखाची तातडीची मदत     |      बिबट्यापासून दहशतमुक्तीसाठी संगमनेर तालुक्यातील हजारो नागरिक रस्त्यावर     |     
नदीपात्रात वाहून गेलेल्या विजय कुटेचा मृतदेह तब्बल चौथ्या दिवशी सापडला By Admin 2025-08-29

दैनिक आनंद News (प्रतिनिधी)




नदीपात्रात वाहून गेलेल्या विजय कुटेचा मृतदेह तब्बल चौथ्या दिवशी सापडला

संगमनेर (प्रतिनिधी) प्रवरेच्या छोट्या पुलावरून ड्युटीवर जात असताना नदीपात्रात फुले टाकताना तोल जाऊन पडल्याने नदीच्या प्रवाहात वाहून गेलेल्या तरुणाचा मृतदेह आज शुक्रवारी सकाळी तब्बल चौथ्या दिवशी तालुक्यातील खराडी जवळ नदीपात्रात आढळून आला त्याचा शोध घेण्यासाठी गेल्या तीन-चार दिवसांपासून अहोरात्र प्रयत्न सुरू होते ड्रोन द्वारेही शोध घेण्यात आला अखेर आज प्रशासनाचे सर्वांच्या प्रयत्नाला यश आले व त्याचा मृतदेह सापडला त्याचा मृतदेह सापडल्याचे वृत्त रंगार गल्ली व चव्हाणपुरा परिसरात समजतात सर्वजण शोकमग्न झाले 

गणेश चतुर्थीच्या पूर्वसंध्येला शहरातील प्रवारा नदीवर संगमनेर खुर्द कडे जाणाऱ्या छोट्या पुलावर मंगळवारी रात्री नऊ ते दहाच्या दरम्यान ही घटना घडली होती या घटनेत विजय कुठे व हे नेहमीप्रमाणे सिद्धकला हॉस्पिटलमध्ये कामास निघाले होते तत्पूर्वी ते नदीमध्ये फुले टाकून पुढे जाणार होते परंतु नदीत तोल गेल्याने त्यांच्या घरच्यांनी शोध घेऊनही ते सापडले नव्हते विजय कुठे हे सिद्धकला हॉस्पिटल येथे सुरक्षारक्षक म्हणून काम करत होते घरात आई-वडील पत्नी मुलगा व मुलगी असा परिवार राहत होता हालाखीची परिस्थिती असल्याने त्यांच्यावर या प्रसंगाने संपूर्ण कुटुंब  शोकाकुल झाले

Special Offer Ad