नदीपात्रात वाहून गेलेल्या विजय कुटेचा मृतदेह तब्बल चौथ्या दिवशी सापडला     |      आमदार अमोल खताळ यांच्या हल्ल्या बाबत मंत्री विखे यांनी सातला निशाणा     |      महाराणा प्रताप मंडळाचा नवदुर्गा मंदिर देखावा पहिल्याच दिवसापासून संगमनेरकरांना पाहता येणार आहे     |      शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय महायुतीच्या अजेंड्यावर : उपमुख्यमंत्री शिंदे     |      अनबाउंड स्टुडिओचे आर्किटेक जय चौहान यांचा बेंगलोर येथे विशेष पुरस्काराने सन्मान     |      तालुक्याच्या अस्मितेसाठी 25000 नागरिकांचा भव्य विराट मोर्चा     |      संगमनेर शहरात मंगळसूत्र चोरांचा धुमाकूळ सुरूच ! महिलेचे तोंड दाबून मंगळसूत्र पळवले...     |      भंडारदरा धरण भरले, प्रवरा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा     |      यांच्यासारखा नथुराम गोडसे समोर आल्यास, विचार अन् तत्वासाठी आनंदानं बलिदान स्वीकारील'; बाळासाहेब थोरातांचं मोठं विधान     |      संगमनेरात ३००फूट तिरंगा पदयात्रा – हजारो विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग     |     
यांच्यासारखा नथुराम गोडसे समोर आल्यास, विचार अन् तत्वासाठी आनंदानं बलिदान स्वीकारील'; बाळासाहेब थोरातांचं मोठं विधान By Admin 2025-08-19

दैनिक आनंद News (प्रतिनिधी)




यांच्यासारखा नथुराम गोडसे समोर आल्यास, विचार अन् तत्वासाठी आनंदानं बलिदान स्वीकारील'; बाळासाहेब थोरातांचं मोठं विधान

संगमनेर  : तथाकथित कीर्तनकार संग्रामबापू भंडारे यांनी संगमनेरमधील कीर्तनानंतर निर्माण झालेल्या राजकीय वादावरून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरातांना इशारा देताना आम्हाला नथुरामजी गोडसे व्हावे लागले, अशी भाषा वापरली होती.

यावर बाळासाहेब थोरातांनी आज पत्रकार परिषद घेत, 'मी काही महात्मा गांधी नाही अन् होऊ शकत नाही. परंतु असा कुणी नथुराम गोडसे समोर आल्यावर, विचार अन् तत्वासाठी आनंदानं बलिदान स्वीकारील', असा मोठी प्रतिक्रिया दिली आहे. बाळासाहेब थोरातांच्या या प्रतिक्रियेचे संगमनेरसह महाराष्ट्रात भावनिक पडसाद उमटू लागले आहेत.

काँग्रेस (Congress) नेते बाळासाहेब थोरात यांनी पत्रकार परिषद घेत संगमनेरमधील कीर्तनातील राजकीय गोंधळावर भाष्य केले. तसेच तथाकर्थित कीर्तनकार संग्रामबापू भंडारे यांनी नथुरामजी गोडसे होण्याची वापरलेली भाषेवर प्रतिक्रिया देताना, कीर्तनकारांची पथ्य काय? राज्यघटनेतील मुलभूत तत्व काय आहेत? याची मांडणी करताना विरोधकांना सुनावलं आहे.

संग्रामबापू भंडारे यांनी, मला नथुरामजी गोडसे व्हावं लागेल, असा इशारा दिला आहे. त्यावर बोलताना थोरात म्हणाले, "संगमनेरच्या (Sangamner) घुलेवाडीतील कीर्तनात घडलं काय, त्यावर त्यांना कुणी थांबवलं नाही. परंतु त्यांनी मूळ अभंग सोडून, ज्यावेळेस ते इकडचे-तिकडचे, दुसरे विषय बोलायला लागले, स्थानिक राजकारणावर बोलायले लागले, राज्यघटनेतील मुलभूत तत्त्वावर बोलायला लागले, नकारात्मत बोलायला लागेल, तेव्हा एका युवकाने उभं राहून, महाराज तु्म्ही अभंगावर बोला, एवढचं म्हटला."

'कीर्तनात काय काय वक्तव्य केले महाराजांनी, तर ते तथाकथित महाराज आहे. खऱ्या वारकारी संप्रदायाच्या परंपरेत काही असे घुसले आहेत, राजकारण करण्यासाठी घुसले आहेत, त्यातला तो प्रकार आहे. आणि त्यानंतर त्याने जे केलं, कुणीही त्यांचं कीर्तन तिथं थांबवलं नाही, कोणताही हल्ला त्यांच्यावर झालेला नाही, त्यांच्या गाडीची तोडफोड झालेली नाही, तिथं पत्रकार मंडळी होती. त्यांना सर्व माहिती आहे', असे थोरातांनी पत्रकार परिषदेत जाहीरपणे सांगितले.

परंतु खोट्या-नाट्या केसेस करणं, हा सर्व उद्योग सुरू झालेले आहेत. माझं मत असे आहे की, इथले लोकप्रतिनिधी, इथले महाराज कुणाच्या तरी हातातील खेळणं बनलेले आहेत. संगमनेर तालुक्यात अस्वस्थता निर्माण करण्यासाठी, महाराष्ट्रात देखील, अशीच वक्तव्य करत फिरत असतात, ही वस्तूस्थिती असल्याचे गंभीर निरीक्षण बाळासाहेब थोरातांनी नोंदवले.

'नथूराम गोडसे व्हावे लागेल, महात्मा गांधीजींसारखं, असं बलिदान आल्यास आनंदानं घेईल मी! जर कुणी, तत्त्वाकरता, विचाराकरता जगत असताना, कुणी आमच्यासमोर, असा नथुराम गोडसे आला एखादा तर, मी बलिदान घेण्यास मागे पुढे पाहणार नाही, आनंद घेईल. मी महात्मा गांधी नाही, पण विचाराकरताना बलिदान आनंदानं स्वीकारण्याची तयारी आहे', असे बाळासाहेब थोरात यांनी म्हटले.