रघुवीर खेडकर यांना पद्मश्री पुरस्कार हा लोककलावंतांचा सन्मान - माजी मंत्री बाळासाहेब थोरात     |      शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख आप्पासाहेब केसेकर यांचे निधन      |      दिलीपराव पुंड यांना मातृशोक     |      उद्धव ठाकरे शिवसेनेचा रणशंखनाद पंचायत समिती जिल्हा परिषद भगव्याखालीच     |      कोण होणार नगराध्यक्ष ? उत्सुकता शिगेला तीन जागांसाठी शांततेत मतदान     |      घुलेवाडी साठवण तलावातील गौन खनिज बाबत महसूल विभागाचे दुर्लक्ष     |      चंदन चोरी पकडली     |      विधानसभेत खोटे बोलणाऱ्या खताळांविरुद्ध तक्रार दाखल करणार खोटे व्हिडिओ आणि फ्लेक्सबाजी शिवाय वर्षातील एक तरी काम दाखवा     |      आ.सत्यजित तांबे यांच्या पाठपुराव्यातून बिबट्याच्या हल्ल्यातील मयत सिद्धेश कडलगच्या कुटुंबीयांना 10 लाखाची तातडीची मदत     |      बिबट्यापासून दहशतमुक्तीसाठी संगमनेर तालुक्यातील हजारो नागरिक रस्त्यावर     |     
संगमनेर शहरात मंगळसूत्र चोरांचा धुमाकूळ सुरूच ! महिलेचे तोंड दाबून मंगळसूत्र पळवले... By Admin 2025-08-20

दैनिक आनंद News (प्रतिनिधी)




संगमनेर शहरात मंगळसूत्र चोरांचा धुमाकूळ सुरूच ! महिलेचे तोंड दाबून मंगळसूत्र पळवले...

संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरणाऱ्या चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून मंगळसूत्र चोरीचे प्रमाण वाढत आहे.

सुवर्णा रमेश काळे या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र अक्षरशः भर दिवसा वाहतुकीच्या रस्त्यावरून त्यांचे तोंड दाबून गळ्यातून ओढून नेण्याचा प्रकार घडला आहे. या संदर्भात त्यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.सुवर्णा काळे ह्या गोविंद नगर परिसरातील कॉर्नर किराणा दुकानामधून किराणा सामान घेऊन गोल्डन सिटी समोरील कमानी जवळून घरी जात असताना त्यांच्या पाठीमागून येऊन रस्त्यावरच एका चोरट्याने त्यांचे तोंड दाबून त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र बळजबरी करून तोडून नेले. या संदर्भात पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यात आली असली असून सदर घटनेचे सीसीटीव्ही फुटेज देखील देण्यात आले आहे.विशेष म्हणजे चालत आलेल्या या चोरट्याने मंगळसूत्र चोरी करून पळ काढल्यानंतर पुढे त्याचा साथीदार मोटरसायकलवर तयार बसला होता. या मोटार सायकल वरून दोघांनी पलायन केले आहे. 12 ग्रॅम वजन असलेले सोन्याचे गंठण आणि त्याला 30 ग्रॅम वजन असलेले चांदीचे शिवलिंग चोरट्यांनी चोरून नेले आहे. विशेष म्हणजे चालत आलेल्या या चोरट्याने मंगळसूत्र चोरी करून पळ काढल्यानंतर पुढे त्याचा साथीदार मोटरसायकलवर तयार बसला होता. या मोटार सायकल वरून दोघांनी पलायन केले आहे. 12 ग्रॅम वजन असलेले सोन्याचे गंठण आणि त्याला 30 ग्रॅम वजन असलेले चांदीचे शिवलिंग चोरट्यांनी चोरून नेले आहे.



Special Offer Ad