लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी डॉक्टर अमोल कर्पे याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी     |      ५० हजाराच्या लाच प्रकरणात पत्रकार आणि तलाठी एसीबीच्या जाळ्यात     |      महाविद्यालयातील तरुणीवर अत्याचार, आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल     |      संगमनेर मर्चंट बँकेच्या चेअरमनपदी राजेश मालपाणी तर व्हा.चेअरमनपदी मधुसूदन नावंदर यांची एकमताने निवड     |      हनुमान जयंती उत्सवात धुडगूस घालणाऱ्या ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल; एक अल्पवयीन     |      जवळेकडलग - वडगाव लांडगा रस्ता लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या पाठपुराव्यातूनच     |     
अमृतवाहिनी पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांचे राज्यस्तरीय टेक्निकल प्रदर्शनात प्रथम क्रमांक By Admin 2025-04-09

दैनिक आनंद News (प्रतिनिधी)




अमृतवाहिनी पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांचे राज्यस्तरीय टेक्निकल प्रदर्शनात प्रथम क्रमांक

संगमनेर (प्रतिनिधी)--महाराष्ट्राचे माजी शिक्षण मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली उच्च गुणवत्ता शिक्षणाबरोबर विविध राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कंपन्याशी समन्वय असलेल्या अमृतवाहिनी पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांनी  डीपेक्स 2025 या टेक्निकल प्रदर्शनामध्ये प्रथम क्रमांक मिळविला  असल्याची माहिती प्राचार्य प्रा.व्ही.बी धुमाळ यांनी दिली आहे.
याबाबत अधिक माहिती देताना प्रा. धुमाळ म्हणाले की, लोकनेते बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ सुधीर तांबे व कार्यकारी विश्वस्त  सौ शरयूताई देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रमांबरोबर विविध राष्ट्रीय कंपन्याशी टायप करून विद्यार्थ्यांना थेट नोकरीसाठी संधी उपलब्ध करून दिली जात आहे. याचबरोबर विद्यार्थ्यांमधील संशोधन वृत्तीला वाव मिळावा याकरता सातत्याने विविध उपक्रमांचे आयोजन केले जात आहे. अमृतवाहिनी पॉलिटेक्निक मधील इलेक्ट्रॉनिक अँड टेलिक कम्युनिकेशन इंजीनियरिंग विभागातील  अपूर्वा आडेप, सानिया भोईर ,उत्कर्ष भामरे या विद्यार्थिनींनी डीपेक्स 2025 या राज्यस्तरीय टेक्निकल प्रकल्प स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवला आहे. त्यांना या स्पर्धेमध्ये दहा हजार रुपयांची रोप बक्षीस ट्रॉफी व सन्मानपत्र देण्यात आले आहे. 
या यशानंतर संस्थेच्या कार्यकारी विश्वस्त सौ शरयू ताई देशमुख यांनी या विद्यार्थिनींचा सत्कार केला.
या उत्कृष्ट कामगिरीबद्दल या विद्यार्थिनींचे लोकनेते बाळासाहेब थोरात, मा. आ. डॉ.सुधीर तांबे, विश्वस्त सौ शरयूताई देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, प्राचार्य प्रा. व्ही बी धुमाळ, डॉ जे बी गुरव ,उप प्राचार्य जी.बी काळे इलेक्ट्रॉनिक अँड टेलिक कम्युनिकेशन विभाग प्रमुख प्रा एस व्ही गायकवाड ,प्रा. जी एल बोराडे यांनी अभिनंदन केले आहे.