दैनिक आनंद News (प्रतिनिधी)
महायुती मधून सौ. रेखा गलांडे यांचे नाव आघाडीवर*
संगमनेर (प्रतिनिधी)--संगमनेर नगर परिषदेची निवडणूक जवळ येऊ लागल्याने उमेदवारांची चर्चा जास्त होत आहे. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी किंवा शहर विकास आघाडी लढणार असून महायुतीकडून लढणाऱ्या नावांपैकी सौ रेखा संपत गलांडे यांचे नाव आघाडीवर आहे.
रेखा संपत गलांडे यांनी सातत्याने जनतेमध्ये राहून जनसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. व्यापारी वर्गामध्ये त्यांचा मोठा संपर्क असून त्यांचे पती संपत गलांडे यांनी सातत्याने गोरगरिबांना मदत केली आहे. व्यवसायाच्या माध्यमातून व्यापारी बांधवांमध्ये त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध असून स्वतः सौ रेखा गलांडे या अत्यंत लढवाय या कार्यकर्ते आहेत
याचबरोबर मागील दोन वेळा नगर परिषदेच्या निवडणुका त्या लढल्या असून कार्यकर्त्यांचा मोठा संच निर्माण केला आहे. अनेक दिवसांपासून नगराध्यक्ष पदासाठी त्यांनी तयारी केली असून विविध प्रभागांमधून त्यांना मोठा पाठिंबा मिळत आहे.