रघुवीर खेडकर यांना पद्मश्री पुरस्कार हा लोककलावंतांचा सन्मान - माजी मंत्री बाळासाहेब थोरात     |      शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख आप्पासाहेब केसेकर यांचे निधन      |      दिलीपराव पुंड यांना मातृशोक     |      उद्धव ठाकरे शिवसेनेचा रणशंखनाद पंचायत समिती जिल्हा परिषद भगव्याखालीच     |      कोण होणार नगराध्यक्ष ? उत्सुकता शिगेला तीन जागांसाठी शांततेत मतदान     |      घुलेवाडी साठवण तलावातील गौन खनिज बाबत महसूल विभागाचे दुर्लक्ष     |      चंदन चोरी पकडली     |      विधानसभेत खोटे बोलणाऱ्या खताळांविरुद्ध तक्रार दाखल करणार खोटे व्हिडिओ आणि फ्लेक्सबाजी शिवाय वर्षातील एक तरी काम दाखवा     |      आ.सत्यजित तांबे यांच्या पाठपुराव्यातून बिबट्याच्या हल्ल्यातील मयत सिद्धेश कडलगच्या कुटुंबीयांना 10 लाखाची तातडीची मदत     |      बिबट्यापासून दहशतमुक्तीसाठी संगमनेर तालुक्यातील हजारो नागरिक रस्त्यावर     |     
अमली पदार्थांच्या तस्करी मागे हप्तेखोरी हे एकमेव कारण * अमली पदार्थांची वाढलेली तस्करी अत्यंत चिंतेची By Admin 2025-11-03

दैनिक आनंद News (प्रतिनिधी)




अमली पदार्थांच्या तस्करी मागे हप्तेखोरी हे एकमेव कारण * अमली पदार्थांची वाढलेली तस्करी अत्यंत चिंतेची

संगमनेर (प्रतिनिधी)--चाळीस वर्ष हा तालुका आपण परिवार म्हणून सांभाळला. वाईट प्रवृत्ती येऊ दिल्या नाही. मात्र आता कधी न येणारे लोक हिंदुत्वाचा खोटा बुरखा पांघरून संगमनेर मध्ये येऊ लागले आहेत. धर्माच्या नावावर काळे धंदे सुरू केले आहेत. अमली पदार्थांची तस्करी सुरू झाली आहे. या पाठीमागे कुणाचा आशीर्वाद आहे हे ओळखा ,अमली पदार्थांच्या वाढलेल्या तस्करी मागे हप्ते खोरी हे एकमेव कारण असल्याची टीका  काँग्रेसचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.

 सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर ते बोलत होते यावेळी मा. आमदार डॉ.सुधीर तांबे, रणजीतसिंह देशमुख, पांडुरंग पाटील घुले, सौ कांचनताई थोरात, संपतराव डोंगरे, रामहरी कातोरे , डॉ. जयश्रीताई थोरात , शंकरराव खेमनार, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांच्यासह अमृत उद्योग समूहातील विविध पदाधिकारी उपस्थित होते.

Special Offer Ad