राजस्थानी छन्याती ब्राह्मण जगदीश मंदिर ट्रस्टच्या अध्यक्षपदी श्री. राजेश जगदीशजी आसोपा यांची, तर उपाध्यक्षपदी श्री. नितीन नंदलालजी ओझा यांची एकमताने निवड करण्यात आली     |      पंचायत समिती मारहाण प्रकरणात अभिषेक थोरातसह चौघांना अटकपूर्व जामीन मंजूर     |      रघुवीर खेडकर यांना पद्मश्री पुरस्कार हा लोककलावंतांचा सन्मान - माजी मंत्री बाळासाहेब थोरात     |      शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख आप्पासाहेब केसेकर यांचे निधन      |      दिलीपराव पुंड यांना मातृशोक     |      उद्धव ठाकरे शिवसेनेचा रणशंखनाद पंचायत समिती जिल्हा परिषद भगव्याखालीच     |      कोण होणार नगराध्यक्ष ? उत्सुकता शिगेला तीन जागांसाठी शांततेत मतदान     |      घुलेवाडी साठवण तलावातील गौन खनिज बाबत महसूल विभागाचे दुर्लक्ष     |      चंदन चोरी पकडली     |      विधानसभेत खोटे बोलणाऱ्या खताळांविरुद्ध तक्रार दाखल करणार खोटे व्हिडिओ आणि फ्लेक्सबाजी शिवाय वर्षातील एक तरी काम दाखवा     |     
संगमनेर तालुक्यातील जनतेच्या दबावावरून महसूल मंडळाची फेररचना By Admin 2025-02-21

दैनिक आनंद News (प्रतिनिधी)




लोकनेते बाळासाहेब थोरात व कृती समितीच्या आक्रमकतेनंतर सत्ताधारी नरमले

संगमनेर (प्रतिनिधी)- लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली विकसित ठरलेला संगमनेर तालुक्याचा विकास रोखण्यासाठी प्रशासनाच्या नावाखाली संगमनेर तालुका तोडण्याचा डाव जनतेने हाणून पाडण्यासाठी आक्रमक पवित्रा घेतला. लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर तालुक्याची मोडतोड होऊ देणार नाही असा इशारा दिला तर आ सत्यजित तांबे यांनीही मंत्रालयात पाठपुरावा केला .जनता ही रस्त्यावर उतरली आणि त्यातून आता महसूल मंडळाची फेररचना होणार आहे.

आश्वी बुद्रुक येथे प्रस्थापित अप्पर तहसील कार्यालयाच्या फेररचनेमध्ये संगमनेर शहराजवळील अनेक गावे जोडली आहेत. समनापुर व संगमनेर खुर्द महसूल मंडळ त्यामध्ये समाविष्ट केले आहेत यामुळे 62 गावांमधील नागरिकांची मोठी गैरसोय होणार आहे. सत्ताधाऱ्यांनी संगमनेर तालुका मोडण्याचा कुटील डाव आखला होता मात्र लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी आक्रमक इशारा दिला. याचबरोबर जनता ही रस्त्यावर उतरली कृती समितीने आंदोलन केले तालुका बचाव कृती समिती आणि तालुक्यातील 62 गावांमधील जनता एकवटली. 

वेळोवेळी निदर्शने केली निवेदन दिली आणि अमर उपोषणाचा व आत्मदहनाचा इशाराही दिला. याचबरोबर प्रशासकीय पातळीवर माजी  महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सातत्याने पाठपुरावा केला आमदार सत्यजित तांबे ही मंत्रालयात महसूल मंत्री यांची भेट घेतली 

Special Offer Ad