संगमनेर मध्ये श्रीराम कथेचे आयोजन ; मालपाणी लॉन्स मध्ये चालणार नऊ दिवस धार्मिक उत्सव     |      काकडवाडीच्या महालक्ष्मी मंदिरातील सोने अन् ऐवज चोरणारी टोळी जेरबंद, सापळा रचला अन् असं केलं जेरबंद     |      पुणे नाशिक महामार्गावरील चंदनापुरी घाटात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार     |      दोन्ही गटांना परवानगी नाकारल्याचा प्रशासनाचा निर्णय  ?     |      संगमनेरातील अतिक्रमणांवर पुन्हा जेसीबी!     |      संगमनेर शहरात शिवजयंती उत्सव वादावर तोडगा काढण्याचे काम सुरू     |     
कान्हा ज्वेलर्स दरोड्यातील आरोपींवर मोक्काची कारवाई By Admin 2025-03-01

दैनिक आनंद News (प्रतिनिधी)




कान्हा ज्वेलर्स दरोड्यातील आरोपींवर मोक्काची कारवाई

संगमनेर तालुका (प्रतिनिधी)- तालुक्यातील साकूर येथील कान्हा ज्वेलर्सवर दरोडा घालणाऱ्या आरोपीविरुध्द मोक्का कायद्यान्वये कारवाई करण्यात आली असल्याची माहिती संगमनेर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे यांनी दिली. नोव्हेंबर महिन्यात कान्हा ज्वेलर्समध्ये गिऱ्हाईकांना सोन्याचे दागिने दाखवत असताना अचानक पाच अनोळखी इसम हातात गावठी कट्टे घेवून आले आणि धाक दाखवून सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण ५२ लाख ४१ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल दुकानाबाहेर घेऊन जाताना हवेत तीनवेळा गोळीबार केला. त्यानंतर दुचाकीवरून मांडवे रस्त्याच्या दिशेने पळून गेले. याप्रकरणी घारगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेची पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी तत्काळ दखल घेऊन खास पथके तयार करून आरोर्षीचा शोध घेण्यासाठी पाठविले होते. अवघ्या १२ तासांतच गुन्ह्यातील दोन आरोपीना नऊ आरोपी निष्पन्न; साडेसतरा लाखांचा मुद्देमाल हस्तगत
ताब्यात घेण्यात आले होते. त्यानंतर तीन दिवसांतच पाच आरोपींना ताब्यात घेवून चोरी केलेल्या सोन्याच्या दागिन्यांपैकी १९५.२५० ग्रॅम सोन्याची लगड व इतर मुद्देमाल असा एकूण १७ लाख ३५ हजार ४२५ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करून गुन्ह्यात नऊ आरोपी निष्पन्न केले आहेत. यामध्ये अक्षय बाळासाहेब वावरे (वय २४), स्वप्नील किशोर येळे (वय २२, दोघेही रा. माळेगाव, येळे ढाळे बस्ती, ता. बारामती जि. पुणे), सुनील उर्फ निल विजय चव्हाण (वय २८, रा. गणेशपेठ पुणे), मनोज उर्फ दयावानं बाळू उर्फ बाळासाहेब साठे (वय २५, रा. गोरडवाडी, ता. माळशिरस, जि. सोलापूर), अजय उर्फ भोऱ्या उर्फ भोल्या बाळू देवकर (वय २२, रा. कौठे यमाई, ता. शिरूर, जि. पुणे), योगेश अंकुश कडाळे (वय २७, रा. धामणी, लोणी, ता. आंबेगाव, जि. पुणे), आकाश ठकाराम दंडवते (वय २८, रा. मलठण, ता. शिरूर, जि. पुणे) यांना अटक. केली आहे. तसेच धोंडीभाऊ उर्फ धोंड्या महादू जाधव (रा. निघोज, ता. पारनेर, हल्ली रा. मंचर, जि. पुणे (फरार)), सूरजसिंग उर्फ मन्ना उर्फ अजयसिंग (रा. हारदो चक बांम्बा, मंदिर म्हाभ्रा भागी, तर्नतरन पंजाब (फरार)) असे दोघे फरार आहेत. सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी अधिनियम अंतर्गत प्रस्ताव तयार करणेबाबत वरिष्ठांनी आदेशित केले होते. त्यानुसार घारगावचे पोलीस निरीक्षक दिगंबर भदाणे यांनी गुन्ह्यातील आरोपीवर दाखल गुन्ह्यांची माहिती प्राप्त केली असता त्यांच्यावर गंभीर स्वरुपाचे २१ गुन्हे दाखल असल्याने मोक्काचे गुन्ह्यात कलम वाढवून सखोल तपास करण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे यांना सूचना दिल्याने घारगावचे सहायक पोलीस निरीक्षक कल्पेश दाभाडे, पोकॉ. सुरेश शेळखे, सुभाष बोडखे, प्रमोद गाडेकर, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील पोहेकॉ. राहुल डोके, पोकॉ. राहुल सारबंदे, मपोकॉ. ताई शिंदे यांचे पथक अधिक तपास करत आहे.