संगमनेर महायुती व आमदार अमोल खताळ युवा मंचाने काढला कॅन्डल मार्च     |      प्रवरानदी पात्रात वाळू चोरी करताना तस्कराला रंगेहात पकडले ! सहा जणांवर गुन्हा दाखल     |      अरुण उंडे संगमनेरचे नवे प्रांताधिकारी     |      सिंचनापासून वंचित राहिलेल्या सर्व गावांचे होणार सर्वेक्षण     |      अनिल शिंदे यांना बंधू शोक     |      संगमनेरमध्ये सराईतांच्या दोन टोळ्या पकडल्या! सात आरोपींना अटक, दीड लाखाचा मुद्देमाल जप्त     |      संगमनेरमध्ये गोवंश हत्यासत्र सुरूच; पोलीस, पालिका प्रशासनाबरोबरच 'हिंदुत्ववादी' आणि 'मुस्लिम' नेत्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह     |      शरद पवारांचे ५० % लाडक्या बहिणींना तिकीट, स्थानिक स्वराज्य निवडणुकीआधी मोठी घोषणा....     |      नाशिक-पुणे महामार्गावर अपघातः आयशर टेम्पो आणि बस यांच्यात धडक; एक गंभीर जखमी     |      शेतात काय करता असे म्हणत बाप-लेकाला मारहाण ! पाच जणांवर गुन्हा दाखल     |     
संगमनेरात लवकरच ३ ग्रामीण रुग्णालये : डॉ. जहऱ्हाड By Admin 2025-06-05

दैनिक आनंद News (प्रतिनिधी)




तळेगाव, चंदनापुरी, धांदरफळमध्ये साकारणार प्रत्येकी ३० खाटांचे रुग्णालय ।

संगमनेर तालुक्यातील रुग्णांना जवळच्या ठिकाणी वैद्यकीय उपचार उपलब्ध उपलब्ध व्हावेत, यासाठी तळेगाव, चंदनापुरी व धांदरफळमध्ये प्रत्येकी ३० खाटांचे ग्रामीण रुग्णालय सुरू होणार आहेत, अशी माहिती घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजकुमार जहऱ्हाड यांनी दिली. दरम्यान, पठार भागातील नागरिकांच्या सोयीसाठी बोटा येथे ग्रामीण रुग्णालय मंजूर झाले आहे. त्याचे काम सुरू आहे. सध्या तालुक्यात घुलेवाडी येथे एकच ग्रामीण रुग्णालय आहे. येथे अत्याधुनक सुविधा उपलब्ध आहेत. १०० खाटांच्या रुग्णालयाचे काम सुरू आहे. त्याची क्षमता वाढविली जात आहे. नव्याने डायलेसीस सुविधा सुरू झाली आहे. सध्या गरजू व सर्वसामान्य रुग्ण या सेवेचा लाभ घेत आहेत. ग्रामीण रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शासनाकडून संगमनेर तालुक्यातील ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्रांमार्फत सध्या नागरिकांना आरोग्य सेवा दिली जात आहे. शहरातही नगरपालिका रुग्णालयात लवकरचं शासन आधुनिक सुविधा उपलब्ध करून देणार आहे. यासाठी वरिष्ठ पातळीवर हालचाली सुरू आहेत. संगमनेर तालुक्याची वाढती लोकसंख्या लक्षात घेता, तालुक्यात तळेगाव, चंदनापुरी व धांदरफळ येथे नवीन तीनग्रामीण रुग्णालय सुरू करावे, असा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे. ग्रामीण भागातील नागरिकांनाही जवळच्या ठिकाणी चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी ग्रामीण रुग्णालय सुरू करावे, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत होती. शासनाने या प्रस्तावास हिरवा कंदील दाखविला आहे. लवकरचं तालुक्यात तीन ठिकाणी ग्रामीण रुग्णालय सुरू करण्यासंदर्भात पुढील कार्यवाही केली जाणार आहे. यामुळे ग्रामीण भागातील रुग्णांना या सुविधेचा मोठा फायदा होणार आहे.


संगमनेर तालुक्यात ग्रामीण रुग्णालय सुरू करण्यासंदर्भात शासनाने प्रस्ताव मागविला होता. तळेगाव, चंदनापुरी व धांदरफळ या ठिकाणी ३ नवीन ग्रामीण रुग्णालय सुरू करण्याचा प्रस्ताव शासनाला पाठविला आहे. यामुळे तालुक्यात आणखी तीन ग्रामीण रुग्णालयांची निर्मिती होणार आहे.

- डॉ. राजकुमार जऱ्हाड, वैद्यकीय अधीक्षक, घुलेवाडी ग्रामीण रुग्णालय, संगमनेर

 


बोटा ग्रामीण रुग्णालयाचे काम सुरू

संगमनेर तालुक्यातील पठार भागातील नागरिकांच्या आरोग्य सोयीसाठी बोटा येथे ग्रामीण रुग्णालयाला मंजुरी मिळाली आहे. त्याचे काम सुरू झाले आहे. शहरातील नागरिकांच्या आरोग्य सोयीसाठी नगरपालिकेच्या आवारात असलेल्या रुग्णालयात नव्याने आधुनिक सेवा सुरू केल्या जाणार आहेत.