संगमनेर मध्ये निवडणुकीच्या धामधुमीत कारमधून 1 कोटी रोख रक्कम जप्त     |      संगमनेरच्या पाणी योजनेचे कोपरगावात कौतुक     |      नगराध्यक्षपदासह सातजणांनी दाखल केली उमेदवारी ! संगमनेर नगरपालिका निवडणूक ऑफलाईन'च्या सुविधेने उत्कंठाही वाढवली     |      राजकीय पक्षांची संभाव्य धोका टाळण्यासाठी स्वातंत्र्य लढण्याची तयारी     |      संगमनेर 2.0 जनतेच्या सहभागातून तयार होणार जाहीरनामा - आ. सत्यजीत तांबे यांची घोषणा - संगमनेरकरच ठरवतील संगमनेरकरांचा जाहीरनामा      |      ती' फाइल आधी ३ वेळा माझ्याकडे आली होती; मी ती नाकारली - माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात     |      महायुती मधून सौ. रेखा गलांडे यांचे नाव आघाडीवर*      |      अमली पदार्थांच्या तस्करी मागे हप्तेखोरी हे एकमेव कारण * अमली पदार्थांची वाढलेली तस्करी अत्यंत चिंतेची     |      संगमनेर आता ड्रग्सच्या विळख्यात धोकादायक अवैद्य धंद्यांची नव्याने भर पोलीस कारवाईत २.२३ लाखांच्या मुद्देमाल जप्त     |      लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर मधील वाढलेल्या अमली पदार्थांच्या तस्करीबाबत केली होती चिंता व्यक्त     |     
नगराध्यक्षपदासह सातजणांनी दाखल केली उमेदवारी ! संगमनेर नगरपालिका निवडणूक ऑफलाईन'च्या सुविधेने उत्कंठाही वाढवली By Admin 2025-11-15

दैनिक आनंद News (प्रतिनिधी)




नगराध्यक्षपदासह सातजणांनी दाखल केली उमेदवारी ! संगमनेर नगरपालिका निवडणूक; 'ऑफलाईन'च्या सुविधेने उत्कंठाही वाढवली..

आनंद वृत्तसंस्था : संगमनेर पालिका निवडणुकीसाठी उमेदवारी दाखल करण्याच्या आजच्या सहाव्या दिवशीही उबाठा गटाशिवाय अन्य राजकीय पक्षांचा निरुत्साह कायम असल्याचे दिसून आले. मागील पाच दिवसांत काल शुक्रवारी केवळ एकमात्र अर्ज दाखल झाला होता. त्यानंतर आज त्यात आणखी सातजणांची भर पडली असून त्यात नगराध्यक्षपदासाठी इच्छुक असलेल्या एका महिला उमेदवाराचा समावेश आहे. उमेदवारांना यंदा ऑनलाईन उमेदवारी दाखल करण्याचे बंधन घालण्यात आले आहे, मात्र आयोगाचे संकेतस्थळ सुरुच राहत नसल्याने मोठ्या तक्रारी होत्या. त्यामुळे आयोगाने आता ऑफलाईन अर्ज स्वीकारण्याचाही निर्णय घेतला असून उद्या सुटीच्या दिवशीही इच्छुकांना उमेदवारी दाखल करता येणार आहे. त्यामुळे प्रमुख राजकीय पक्षांना आपल्या अंतिम उमेदवारांची घोषणा लांबवण्याची आयती संधी मिळाल्याने संगमनेरातील लढतींबाबतची उत्कंठाही ताणली जाणार आहे.राज्य निवडणूक आयोगाने जारी केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार सोमवारपासून (ता.10) पालिका निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली. येत्या सोमवारपर्यंत (ता.17) या प्रक्रियेत इच्छुकांना ऑनलाईन अर्ज दाखल करुन त्याची प्रत स्थानिक निवडणूक अधिकाऱ्यांकडे जमा करण्याचे बंधन आहे. मात्र ही प्रक्रिया सुरु झाल्यापासूनच आयोगाचे अधिकृत संकेतस्थळ चालत नसल्याच्या तक्रारी सुरु झाल्या होत्या. त्याचा परिणाम प्रक्रिया सुरु होवून एकामागून एक दिवस उलटत असतानाही संगमनेरसह राज्यातील अनेक ठिकाणी उमेदवारीच दाखल होत नसल्याचे समोर आले.या दरम्यान मोठ्या महत्प्रयासाने शुक्रवारी (ता.14) शेहनाज शेख यांना प्रभाग क्रमांक 11 (ब) मधून आपला पहिला उमेदवारी अर्ज दाखल करण्यात यश मिळाले. त्यातच राज्य निवडणूक आयोगाने इच्छुकांच्या तक्रारींची दखल घेत ऑनलाईनसह ऑफलाईनचाही पर्याय खुला करीत वाया गेलेले दिवस भरुन काढण्यासाठी आज शनिवारसह उद्या रविवारीही उमेदवारी दाखल करण्याची मुभा दिली आहे. त्याचा परिणाम आज एकाच दिवसांत नगराध्यक्षपदाच्या एका अर्जासह सहाजणांनी आपले अर्ज दाखल केले आहेत.आज नगराध्यक्षपदासाठी शबाना रईस शेख यांनी अर्ज दाखल केला असून या पदासाठी सहा दिवसांत दाखल झालेला हा एकमेव अर्ज आहे. या शिवाय आज प्रभाग क्रमांक सात (अ) मधून पूजा त्रिलोक कतारी, (ब) मधून नारायण सावळेराम शिंदे, प्रभाग नऊ (अ) मधून अतिक कमरुद्दीन इनामदार, प्रभाग 13 (अ) मधून प्रिया विलास खरे व कविता अमर कतारी आणि (ब) मधून अमोल राजेंद्र डुकरे अशा सहाजणांचे अर्ज दाखल झाले आहेत.

यावेळी ऑनलाईचे बंधन असल्याने व त्यातच संकेतस्थळाबाबत तक्रारी असल्याने स्थानिक राजकीय पक्षांनी आज रात्री उशिराने अथवा रविवारी अंतिम उमेदवारांची नावे जाहीर करुन त्यांचे अर्ज दाखल करुन घेण्याचे नियोजन केले होते. मात्र राज्यभरातून वाढत्या तक्रारींची दखल घेत राज्य निवडणूक आयोगाने ऑनलाईनसह ऑफलाईन सेवाही सुरु केल्याने स्थानिक राजकीय पक्षांचा जीव भांड्यात पडला असून त्यांना आता शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवारांची नावे लपवण्याची व बंडखोरी टाळण्याची संधी मिळाली आहे. आज दाखल झालेल्या उमेदवारांमध्ये उबाठा गटाच्या संभाव्य उमेदवारांचा समावेश आहे.







Special Offer Ad