अहो, संगमनेर मध्ये चाललय काय     |      वंचित बहुजन आघाडीचा संगमनेर सेवा समितीला पाठिंबा     |      अमली पदार्थांच्या विळख्यात शहरातील तरुणाई, घातक अमली पदार्थांचे धंदे करणारे व करवणारे यांच्या पर्यत पोलिसांचे हात पोचणार काय ?     |      संगमनेरचे लोकप्रतिनिधी अमोल खताळ हे हिंदुत्वाचे वाट लावणारे सौ वैशाली तारे     |      दुहेरी मतदारांमध्ये सुवर्णा खताळ यांचे नाव हा कायदेशीर मुद्दा पुढे येत असल्याने वातावरण ढवळून निघत आहे      |      संगमनेर सेवा समिती ही राजकारण विरहित     |      संगमनेर मध्ये निवडणुकीच्या धामधुमीत कारमधून 1 कोटी रोख रक्कम जप्त     |      संगमनेरच्या पाणी योजनेचे कोपरगावात कौतुक     |      नगराध्यक्षपदासह सातजणांनी दाखल केली उमेदवारी ! संगमनेर नगरपालिका निवडणूक ऑफलाईन'च्या सुविधेने उत्कंठाही वाढवली     |      राजकीय पक्षांची संभाव्य धोका टाळण्यासाठी स्वातंत्र्य लढण्याची तयारी     |     
संगमनेरचे लोकप्रतिनिधी अमोल खताळ हे हिंदुत्वाचे वाट लावणारे सौ वैशाली तारे By Admin 2025-11-21

दैनिक आनंद News (प्रतिनिधी)




काळे धंदेवाल्यांना तिकिटे, संगमनेरात हप्ते खोरी वाढली

संगमनेर (प्रतिनिधी)--संगमनेर चे नवीन लोकप्रतिनिधी यांनी दोन नंबरवाले आणि काळे धंदे करणाऱ्यांना तिकीट वाटप केले आहे. संगमनेर मध्ये सध्या निष्ठावंतांना डावलून  हप्ते खोरीसाठी काम केले जात आहे. आमदार खताळ हे कर्तुत्व शून्य आमदार आहेत. ते पैशाचे राजकारण करत असून हिंदुत्वाचे वाट लावणारे असल्याची टीका शिंदे शिवसेनेच्या महिला आघाडी शहर प्रमुख सौ.वैशाली अशोक तारे यांनी म्हटले आहे.

शिंदे शिवसेनेचा राजीनामा दिल्यानंतर माध्यमांच्या प्रतिनिधीशी बोलताना वैशाली तारे म्हणाल्या की, 2022 पासून मी एकनाथ शिंदे यांच्याबरोबर प्रामाणिकपणे काम करत आहे. खताळ यांना शिंदे सेनेचे तिकीट मिळाले .त्यावेळेस त्यांना कोणी ओळखत नव्हते .आपण अहोरात्र कष्ट घेऊन त्यांचा प्रचार केला. मात्र त्यांनी सातत्याने सरड्याप्रमाणे रंग बदलले. नगरपरिषदेच्या निवडणुकीमध्ये त्यांनी निष्ठावंत कार्यकर्त्यांना अंधारात ठेवून हप्ते खोरीसाठी तिकीट वाटप केले आहे.

आमदार खताळ हे दुसऱ्याच्या बुद्धीने चालणारे असून अजिबात कार्यक्षम नाही. संगमनेर मध्ये ते पैशाचे राजकारण करत असून हिंदुत्वाची त्यांनी वाट लावली आहे. प्रवरा नदीमध्ये मोठ-मोठे क्रेन कुणाच्या आशीर्वादाने सुरू आहे. हे जनतेला माहित आहे. शहरासाठी कोणताही निधी आणला नाही आणि जर निधी आणला असेल तर त्यातील टक्केवारीचे काय असा परखड सवाल त्यांनी उपस्थित केला.

संगमनेर नगर परिषदेमध्ये अत्यंत अनपढ आणि अशिक्षित लोकांना उमेदवारी दिली आहे. म्हणजे कोणता कारभार त्यांना करता आला नाही पाहिजे .आणि टक्केवारी मात्र लोकप्रतिनिधीला मिळाला पाहिजे. म्हणून त्यांनी निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावले आहे.

यांची निष्ठा कोणत्या पक्षाची आहे. हा संगमनेर मध्ये मोठा चर्चेचा विषय आहे .संगमनेर शहरासाठी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सातत्याने निधी आणून विकास केला. निळवंडे धरण पूर्ण केले निळवंडे धरणातून थेट पाणी आणले. हे काम त्यांनी केले यांचे काय योगदान आहे हे फक्त आयत्या पिठावर रेघोट्या मारत आहे.

नवीन लोकप्रतिनिधी यांचे रिकामे भांडे असून त्यांना लायकी पेक्षा जास्त मिळाले आहे. या निवडणुकीमध्ये संगमनेर मधील सुज्ञ जनता अशा रिकाम्या भांड्यांना थारा देणार नाही.

नवीन लोकप्रतिनिधी यांनी  जिल्हाप्रमुख आणि निरीक्षकांना दाबून ठेवले आहे . उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सुद्धा आगामी काळामध्ये हे सर्व महाग पडणार आहे.

यांचा एकही नगरसेवक निवडून येणार नसून अत्यंत अकार्यक्षम आणि कर्तृत्व शून्य लोकप्रतिनिधी संगमनेरला मिळाला हे संगमनेर करांचे दुर्दैव असल्याची टीका त्यांनी केली असून आपल्या पदाचा राजीनामा त्यांनी दिला आहे. याचबरोबर ज्यांना लायकी नसताना अधिक मिळते ती परमेश्वराची कृपा समजावी असेही त्यांनी म्हटले आहे त्यांच्या समवेत

महिला शहर आघाडी संघटक मनीषा अंबादास पंधारे ,महिला आघाडी शाखाप्रमुख वंदना बाळू भुसे, उपशहरप्रमुख सौ ज्योती सागर पंदारे यांनी राजीनामा दिला आहे.

चौकट

विरोध असतानाही थोरात तांबे दुःख प्रसंगी भेटून गेले

आम्ही माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांना सातत्याने विरोध केला. मात्र माझ्या पतीचे निधन झाल्यानंतर थोरात व तांबे कुटुंबीय आमच्या सांत्वनासाठी घरी येऊन गेले. याउलट खताळ यांचे कोणीही घरी फिरकले नाही. त्यांच्या कार्यालयात नेहमी दोन नंबर धंदे करणाऱ्यांची गर्दी असते अशी टीकाही त्यांनी केली आहे.







Special Offer Ad