अवकाळी पावसाने नुकसानग्रस्तांचे तातडीने पंचनामे करा -- मा. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची मागणी     |      श्रीरामनवमी निमित्ताने संगमनेरात विश्व हिंदू परिषद बजरंग दलाची भव्य दिव्य शोभायात्रा     |     
शहरातील बसस्थानक ते गवंडीपुरा रस्ता रुंदीकरणाला पुर्ण विराम By Admin 2025-03-10

दैनिक आनंद News (प्रतिनिधी)




शहरातील बसस्थानक ते गवंडीपुरा रस्ता रुंदीकरणाला पुर्ण विराम

संगमनेर शहरातील अतिक्रमण हटाव मोहीम थंडावली , रस्ता रुंदीकरणाचे कामही कासवगतीने 
संगमनेर -  संगमनेर शहरातील तीन बत्ती चौक ते प्रवरा नदी व पंचायत समिती पर्यंतचे अतिक्रमणे मोठा गाजावाजा करत काढण्यात आली. तीन बत्ती चौक ते प्रवरा नदी पर्यंतचे अतिक्रमणे काढल्यानंतर रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू आहे. मात्र बस स्थानक ते गवंडीपुरा मज्जिद पर्यंत १९२९ सालच्या नोंदीनुसार अतिक्रमणच नसल्याची माहिती मुख्याधिकारी रामदास कोकरे यांनी दिली. यामुळे शहरातील रस्ता रुंदीकरण होणार का नाही याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शिवाय ,दिल्ली नाका परिसरातील रस्ता रुंदीचे करण्याचे कामही सध्या बंदच आहे.
संगमनेर शहरात अतिक्रमणाची समस्या दिवसेंदिवस जटिल बनत चालली आहे. वारंवार अतिक्रमणे काढल्यानंतर पुन्हा अतिक्रमण केले जाते. शहरात सर्वच भागात मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण करण्यात आली. नगरपालिका कारवाई करण्यास धजत नसल्याने शहराला बकालपणा आला आहे. यामुळे वाढत्या संगमनेरला मर्यादा येत आहे.
मात्र अमृतवाहीनी इंजिनिअरिंग कॉलेज ते बस स्थानक या शहरातील नाशिक पुणे महामार्गावरील अतिक्रमणे काढून रस्त्याचे रुंदीकरण करण्यात आले.तेही काम अपूर्ण असून विश्रामगृहा समोर  पर्यंतच काम करण्यात आले. बसस्थानका पर्यंत रस्ता रूंदीकरणाचे काम का रखडले असून ते पुर्ण होण्याची वाट नागरिक पाहत आहे. मात्र बस स्थानक ते गवंडीपुरा परिसरातील अतिक्रमण कधी काढणार असा प्रश्न आता नागरीकांना  पडला आहे. काही दिवसांपर्वीच संगमनेर नगरपालिका,  पोलीस प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभागाने तीन बत्ती चौक ते प्रवरा नदी व पंचायत समिती पर्यंतचे अतिक्रमणे काढली . मात्र बस स्थानक ते गवंडीपुरा या मार्गावरील अतिक्रमाने अद्यापही  जैसे थे आहे. ही अतिक्रमने काढण्यात न आल्याने रस्ता रुंदीकरण रखडले आहे. वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी अतिक्रमण हटवणे गरजेचे आहे. सध्या सुरू असलेले तीन बत्ती चौक ते प्रवरा नदी पर्यंतचे रस्ता रुंदीकरणाचे काम चर्चेचा विषय झाला आहे.अवघा पाच फुट रस्ता रुंदीकरण केले जात असल्याने रस्ता दुतर्फा केला जाणार का या बाबत संशय व्यक्त केला जात आहे. या रस्त्यावरील अतिक्रमणे पुन्हा जैसे थे झाली आहे.या परिसरातील नागरिकही अडथळा आणत आहे. नगरपालिका व पालिस प्रशासन बघ्यांची भूमिका घेत आहे.
तर तीन बत्ती चौक ते पंचायत समिती दिल्ली नाका परिसरातील रस्ता रुंदीकरणाचे काम सध्या बंद आहे. नगरपालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग व पोलीस प्रशासनाने राबवलेली अतिक्रमण हटाव मोहिम  फार्स ठरली आहे. आमदार अमोल खताळ यांनी मोठा गाजावाजा करत श्रेय घेतलेली अतिक्रमण हटाव मोहीम अंगलट आली आहे. अनेक 
राजकीय आरोप प्रत्यारोपानंतर झालेली अतिक्रमण हटाव मोहिमेची कार्यवाही आता संशयाच्या भवऱ्यात सापडली आहे. 
कोट - शहरातील बस स्थानक ते दवंडीपुरा या रस्त्यावर कुठल्याही प्रकारचे अतिक्रमण नाही. १९२९ साली करण्यात आलेल्या रस्ता रुंदीकरणानंतर यात कुठलाच बदल झाला नाही. गावठाण असल्याने या मार्गावर  सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपलब्ध माहितीनुसार अतिक्रमण नाही. रामदास कोकरे -मुख्याधिकारी संगमनेर नगरपालिका 
कोट -नासिक पुणे महामार्गावर शहरात नागरिकांनी फूटपाथवर अतिक्रमणे केली आहे. यामुळे नागरिकांना पायी चालताना अडचण येते. अनेकदा अपघातही होतात. फुटपाथ वर व्यवसाय थाटून रस्त्यावरही अतिकमण करण्यात आले आहे. शहरातील अतिक्रमण हटवून रस्ता रुंदीकरण करणे प्रशासनाला शक्य होत नाही.