संगमनेर शहरातील रस्त्यांसाठी ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर - आ खताळ
By Admin 2025-10-18
दैनिक आनंद News (प्रतिनिधी)
नगरोत्थान अभियानाच्या विशेष रस्ता अनुदानातून होणार रस्त्यांची कामे संगमनेर शहर विकासाला मिळणार गती,
संगमनेर :प्रतिनिधी
संगमनेर नगरपरिषदेच्या हद्दीतील 21 रस्त्यांच्या विकास कामासाठी राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने विशेष रस्ता अनुदान अंतर्गत 5 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असल्याची माहिती आमदार अमोल खताळ यांनी दिली.
संगमनेर शहरातील रस्ते खड्डेमुक्त करण्याकरिता नगरविकास विभागाच्या माध्यमातून विशेष रस्ता अनुदान मिळावे, यासाठी आमदार अमोल खताळ यांनी पाठपुरावा केला होता. या पाठपुराव्याला यश आले असून राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी “नगरोत्थान महाभियान” योजनेतून संगमनेर शहरासाठी विशेष निधी मंजूर करण्यात आला आहे. संगमनेर शहरासाठी दिलेल्या भरीव निधीसाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , उपमुख्यमंत्री व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे आभार आमदार. खताळ पाटील यांनी आभार मानले आहेत .
_*चौकट* -_
"संगमनेरकरांना खड्डेमुक्त रस्त्यांचा दिलासा देणारा निर्णय झाला आहे. अनेक वर्षांपासून शहरातील प्रलंबित रस्त्यांची समस्या गंभीर बनली होती आणि ती इथल्या नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित आहे. मिळालेल्या या निधीमुळे संगमनेरमध्ये रस्त्यांचे दर्जेदार काम होऊन शहराचा चेहरामोहरा बदलणार आहे. तसेच नगरपरिषदेच्या प्रमुख विकासकामांसाठी आवश्यक तितका निधी उपलब्ध करण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. "-
श्री. अमोल खताळ
(आमदार संगमनेर विधानसभा)