संगमनेर तालुक्यातील 'या' देवस्थानच्या जमिनी वक्फ बोर्डाच्या ताब्यात?
By Admin 2025-03-21
दैनिक आनंद News (प्रतिनिधी)
संगमनेर तालुक्यातील 'या' देवस्थानच्या जमिनी वक्फ बोर्डाच्या ताब्यात?
संगमनेर मागील काही दिवसांपासून वक्फ बोर्ड अन वक्फ बोर्डाच्या बेकायदेशीर नोंदणी राज्यभरात चर्चेच्या विषय ठरत आहेत. परंतु आता अहिल्यानगरमधील अनेक ठिकाणच्या देवस्थानाच्या जमिनींची वक्फ बोर्डाकडे बेकायदेशीर नोंदणी झाली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
संगमनेर नगरपालिका हद्दीतील मोक्याच्या ठिकाणी असणारे तसेच संगमेर तालुक्यातील सुकेवाडी, घुलेवाडी, पारेगाव या देवस्थानाच्या जमिनींची वक्फ बोर्डाकडे बेकायदेशीर नोंदणी झाली असल्याची माहिती समजली आहे.
त्याचे झाले असे की, आ.अमोल खताळ यांनी विधानसभेत ही सगळी माहिती मांडली आहे. संगमनेर शहरातील नगरपरिषदेच्या हद्दीतील नवीन नगररोड वरील सर्वे नंबर १४९ (जुना सर्वे नंबर ८०३), क्षेत्र ४ एकर १७ गुंठे या मिळकतीवर,
तसेच तालुक्यातील घुलेवाडी येथील सर्व्हे नंबर १६२ व,१७९ येथील कानिफनाथ व सुकेवाडी येथील सर्व्ह नंबर १९४ मधील कान्होबा देवस्थान व पारेगाव येथील श्रीअश्विनाथ महाराज मंदिर या देवस्थानांच्या हक्काच्या संपूर्ण जमीनीवर वक्फ बोर्ड चुकीच्या पद्धतीने दावा करत आहे.
त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. म्हणून शासनाने या जमिनीबाबत योग्य ती कार्यवाही करून त्या जमीनी परत त्या देवस्थानच्या नावावर करण्यात यावी.
तसेच हिंदूं धर्मियांच्या देवस्थानांवर होत असणारे हल्ले थांबले पाहिजे अशी लक्षवेधी आ. अमोल खताळ यांनी विधान सभेमध्ये मांडत या महत्त्वाच्या मुद्याकडे राज्य शासनाचे लक्ष वेधले. त्यामुळे या काही गोष्टी समोर आल्या आहेत.