रघुवीर खेडकर यांना पद्मश्री पुरस्कार हा लोककलावंतांचा सन्मान - माजी मंत्री बाळासाहेब थोरात     |      शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख आप्पासाहेब केसेकर यांचे निधन      |      दिलीपराव पुंड यांना मातृशोक     |      उद्धव ठाकरे शिवसेनेचा रणशंखनाद पंचायत समिती जिल्हा परिषद भगव्याखालीच     |      कोण होणार नगराध्यक्ष ? उत्सुकता शिगेला तीन जागांसाठी शांततेत मतदान     |      घुलेवाडी साठवण तलावातील गौन खनिज बाबत महसूल विभागाचे दुर्लक्ष     |      चंदन चोरी पकडली     |      विधानसभेत खोटे बोलणाऱ्या खताळांविरुद्ध तक्रार दाखल करणार खोटे व्हिडिओ आणि फ्लेक्सबाजी शिवाय वर्षातील एक तरी काम दाखवा     |      आ.सत्यजित तांबे यांच्या पाठपुराव्यातून बिबट्याच्या हल्ल्यातील मयत सिद्धेश कडलगच्या कुटुंबीयांना 10 लाखाची तातडीची मदत     |      बिबट्यापासून दहशतमुक्तीसाठी संगमनेर तालुक्यातील हजारो नागरिक रस्त्यावर     |     
50 लाख रुपये निधी खर्चून अद्यावत उभारलेली सीसीटीव्ही यंत्रणा बंद का ? By Admin 2025-05-12

दैनिक आनंद News (प्रतिनिधी)




पोलीस प्रशासनाच्या उदासीनतेमुळे सीसीटीव्ही यंत्रणा बंद

संगमनेर (प्रतिनिधी)--लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर शहर हे वैभवशाली व सुसंस्कृत शहर म्हणून ओळखले जाते. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी संगमनेर शहरांमध्ये 50 लाख रुपये निधीतून अद्यावत अशी सीसीटीव्ही यंत्रणा व कंट्रोल रूम उभारण्यात आली. ही सीसीटीव्ही यंत्रणा पोलीस प्रशासनाकडे हस्तांतरित असून सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असलेली ही सीसीटीव्ही यंत्रणा बंद का असा परखड सवाल आमदार सत्यजीत तांबे यांनी विचारला आहे.

अहिल्यानगर येथे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये आमदार सत्यजीत तांबे यांनी संगमनेर शहरातील सुरक्षिततेच्या मुद्द्यावर परखड सवाल केला. लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर हे व्यापारी व आर्थिकदृष्ट्या संपन्न शहर आहे. येथे नागरिकांची राहण्यासाठी पहिली पसंती असून लाखो नागरिकांची शहरांमध्ये दररोज वर्दळ असते. महिलांच्या व नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तत्कालीन नगराध्यक्ष सौ दुर्गाताई तांबे यांच्या पुढाकारातून नगरपरिषदेच्या 50 लाख रुपये निधीतून अद्यावत अशी सीसीटीव्ही यंत्रणा उभारण्यात आलेली आहे.

Special Offer Ad