दैनिक आनंद News (प्रतिनिधी)
आ. सत्यजित तांबे यांच्या पाठपुराव्यातून वेल्हाळे येथील हरीबाबा देवस्थानला क वर्ग तीर्थक्षेत्र दर्जा
संगमनेर (प्रतिनिधी)--नाशिक- पुणे महामार्ग लगत असलेल्या व तालुक्यातील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या वेल्हाळे येथील हरीबाबा देवस्थानला आमदार सत्यजित तांबे यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे क वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळाला आहे. यामुळे या परिसरात सुशोभीकरणासह भाविकांसाठी विविध सुविधा निर्माण होणार आहेत.
वेल्हाळे परिसरातील हरीबाबा हे प्रसिद्ध देवस्थान असून कारखाना, मालदाड,सायखिंडी, गुंजाळवाडी व परिसरातील हजारो भाविकांचे हे श्रद्धास्थान आहे. येथे होणारी भव्य जत्रा व विविध कार्यक्रम लक्षात घेऊन लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या माध्यमातून या मंदिर परिसरात विकासाच्या विविध योजना राबविण्यात आल्या आहेत. नाशिक पुणे महामार्ग लगत असल्याने व भाविकांचे श्रद्धास्थान असल्याने या ठिकाणी वर्षभरात हजारो भाविक येत असतात. दरवर्षी येथे येणाऱ्या नागरिकांची संख्या वाढत आहे.परंतु या ठिकाणी भौतिक सुविधांचा अभाव असल्याने अनेक भाविकांची गैरसोय होते.