रघुवीर खेडकर यांना पद्मश्री पुरस्कार हा लोककलावंतांचा सन्मान - माजी मंत्री बाळासाहेब थोरात     |      शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख आप्पासाहेब केसेकर यांचे निधन      |      दिलीपराव पुंड यांना मातृशोक     |      उद्धव ठाकरे शिवसेनेचा रणशंखनाद पंचायत समिती जिल्हा परिषद भगव्याखालीच     |      कोण होणार नगराध्यक्ष ? उत्सुकता शिगेला तीन जागांसाठी शांततेत मतदान     |      घुलेवाडी साठवण तलावातील गौन खनिज बाबत महसूल विभागाचे दुर्लक्ष     |      चंदन चोरी पकडली     |      विधानसभेत खोटे बोलणाऱ्या खताळांविरुद्ध तक्रार दाखल करणार खोटे व्हिडिओ आणि फ्लेक्सबाजी शिवाय वर्षातील एक तरी काम दाखवा     |      आ.सत्यजित तांबे यांच्या पाठपुराव्यातून बिबट्याच्या हल्ल्यातील मयत सिद्धेश कडलगच्या कुटुंबीयांना 10 लाखाची तातडीची मदत     |      बिबट्यापासून दहशतमुक्तीसाठी संगमनेर तालुक्यातील हजारो नागरिक रस्त्यावर     |     
स्वस्तात सोने देण्याचे आमीष दाखवून दरोडा टाकणारे तीन आरोपी जेरबंद ! By Admin 2025-05-16

दैनिक आनंद News (प्रतिनिधी)




संगमनेरच्या व्यापाऱ्याचे लुटले होते दहा लाख रुपये व सोने स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगरची कारवाई

संगमनेर प्रतिनिधी दिनांक 16

स्वस्तात सोने देण्याचे आमीष दाखवून संगमनेर तालुक्यातील व्यापाऱ्याला जामखेड तालुक्यात बोलावून लुटण्याची घटना घडली होती. या लुटमारी दरोडेखोरीत त्या व्यापाऱ्याचे दहा लाख रुपये आणि सोन्याचे दागिने लंपास करण्यात आले होते. हा दरोडा टाकणारे आरोपी स्थानिक गुन्हे साखरेच्या पथकाने जेरबंद केले असून तीन आरोपींना अटक केली आहे. तर सात आरोपीपसार झाले असल्याची माहिती देण्यात आली आहे.राजेंद्र दिलीप मैड (वय 35, रा. आश्वी, ता. संगमनेर, जि. अहिल्यानगर) एक महिला अश्विनी (आरोपी) हिने 150 ग्रॅम सोने 10 लाख रूपये असे स्वस्तात देण्याचे आमीष दाखवून कुसडगाव, ता. जामखेड येथे बोलविले. मैड हे पैसे घेऊन आल्यानंतर महिला आरोपी अश्विनी व तिच्या 8 ते 10 साथीदारांनी त्यांना मारहाण करून त्यांच्या कडील 10 लाख रूपये रोख रक्कम, सोन्याचे दागीने व मोबाईल असा मुद्देमाल जबरीने चोरून नेला. याबाबत जामखेड पोलीस स्टेशन गुरनं 266/2025 बीएनएस 310 (2) प्रमाणे दरोडयाचा गुन्हा दाखल आहे.दरोडयाच्या गुन्हयांची प्राथमिक माहिती मिळताच पोलीस अधीक्षक राकेश ओला, अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेस तात्काळ तपास पथके नेमून गुन्हयाचा तपास करण्याबाबत आदेश दिले होते.त्यानुषंगाने पोलीस निरीक्षक दिनेश आहेर स्थानिक गुन्हे शाखा व तपास पथकातील पोसई/अनंत सालगुडे व पोलीस अंमलदार दत्तात्रय हिंगडे, गणेश लोंढे, रोहित मिसाळ, भाऊसाहेब काळे, बाळासाहेब खेडकर, अमोल कोतकर, बाळासाहेब गुंजाळ, रमीजराजा आत्तार, विशाल तनपुरे, मनोज लातुरकर, सुनिल मालणकर, मेघराज कोल्हे, उमाकांत गावडे, अरूण मोरे अशांचे पथक गुन्हा उघडकिस आणणे बाबत पथकास रवाना केले.दिनांक 15/05/2025 रोजी पथक जामखेड पोलीस स्टेशन हद्दीमध्ये गोपनीय व तांत्रीक विश्लेषणाच्या आधारे गुन्हयातील आरोपीचा शोध घेत असताना नमूद गुन्हा हा 1) विकास

Special Offer Ad