दैनिक आनंद News (प्रतिनिधी)
संगमनेरात गुटख्यासह ४ हजारांची रोकड जप्त
संगमनेर : अवैधरित्या गुटखा विक्री करणाऱ्या टपरीवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून नऊ हजार रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. याप्रकरणी दोन जणांविरुद्ध येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिसांनी नाशिक-पुणे महामार्गावर शहरानजीक शनिवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास केली.
याबाबत शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संगमनेर शहरातील नाशिक-पुणे महामार्गावरील शहरानजीक असलेल्या एका टपरीमध्ये बेकायदेशीर रित्या गुटख्याची विक्री होत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना समजली. त्यानंतर पोलिसांनी रात्री या ठिकाणी जाऊन कारवाई केली. या कारवाईमध्ये पोलिसांनी सुमारे १० हजार रुपयांचा गुटखा जप्त केला.