नदीपात्रात वाहून गेलेल्या विजय कुटेचा मृतदेह तब्बल चौथ्या दिवशी सापडला     |      आमदार अमोल खताळ यांच्या हल्ल्या बाबत मंत्री विखे यांनी सातला निशाणा     |      महाराणा प्रताप मंडळाचा नवदुर्गा मंदिर देखावा पहिल्याच दिवसापासून संगमनेरकरांना पाहता येणार आहे     |      शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय महायुतीच्या अजेंड्यावर : उपमुख्यमंत्री शिंदे     |      अनबाउंड स्टुडिओचे आर्किटेक जय चौहान यांचा बेंगलोर येथे विशेष पुरस्काराने सन्मान     |      तालुक्याच्या अस्मितेसाठी 25000 नागरिकांचा भव्य विराट मोर्चा     |      संगमनेर शहरात मंगळसूत्र चोरांचा धुमाकूळ सुरूच ! महिलेचे तोंड दाबून मंगळसूत्र पळवले...     |      भंडारदरा धरण भरले, प्रवरा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा     |      यांच्यासारखा नथुराम गोडसे समोर आल्यास, विचार अन् तत्वासाठी आनंदानं बलिदान स्वीकारील'; बाळासाहेब थोरातांचं मोठं विधान     |      संगमनेरात ३००फूट तिरंगा पदयात्रा – हजारो विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग     |     
संगमनेरमध्ये पोलिसांनी बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या वाहनातून ९२ हजारांचा गुटखा केला जप्त By Admin 2025-07-25

दैनिक आनंद News (प्रतिनिधी)




संगमनेरमध्ये पोलिसांनी बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या वाहनातून ९२ हजारांचा गुटखा केला जप्त

संगमनेर - गुटख्याची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या वाहनाला पकडून पोलिसांनी ९२ हजार रुपयांचा गुटखा जप्त केला. पोलिसांनी सोमवारी रात्री पावणे बारा वाजेच्या सुमारास शहरातील एका विद्यालयाच्या परिसरात ही कारवाई केली.

प्रकरणी दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संगमनेर शहरातील ज्ञानमाता हायस्कूल समोर संजय सदाशिव उगलमुगले (रा. तिगाव, ता. संगमनेर) व सागर शिवाजी सोनवणे (रा. चिंचोली गुरव, ता. संगमनेर) हे हिरा पानमसाला व रॉयल ७१७ तंबाखु (एमएच ४६ ए २९२९) क्रमांकाच्या महिंद्रा झायलो गाडीमध्ये गुटखा विक्री करण्याकरीता वाहतुक करीत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांना समजली.

त्यांनी पोलीस पथकाला या ठिकाणी जाऊन कारवाई करण्याची सूचना केली. पोलीस पथकाने रात्री पावणे बारा वाजेच्या सुमारास ज्ञानमाता विद्यालय जवळ या वाहनाला अडविले. पोलिसांनी सदर वाहनाची तपासणी केली असता, वाहनामध्ये विविध कंपन्यांचा गुटखा असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

पोलिसांनी या कारवाईमध्ये पाच लाख रुपये किंमत असलेली सिल्वर रंगाची महिंद्रा कंपनीची झायलो मॉडेलची गाडीमध्ये ९२ हजार रुपये किमतीचा गुटखा जप्त केला. याबाबत पोलीस शिपाई रामकृष्ण मुखरे यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्या फिर्यादीवरून पोलिसांनी संजय उगले व सागर सोनवणे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.