दैनिक आनंद News (प्रतिनिधी)
मागील एक वर्षापासून त्यांची प्रत्येक कामात टोल वसुली सुरू आहे
संगमनेर (प्रतिनिधी)
मागील तीस वर्षात संगमनेर नगरपालिकेला शिस्त लावली आदर्श नगरपालिका म्हणून काम केले .शहरासाठी स्वच्छ पाणी पुरवले .सातत्याने विकासाचा योजना राबवल्या. शहर विकसित केले. मात्र आता काहीजण पूर्णवेळ टोल वसुलीच्या मागे लागली आहे. तर पहिला नगर मनमाड रस्ता पूर्ण करा आणि मग संगमनेरला या अशी टीका लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी केली असून महायुतीचे मंत्री डोंगर मंजूर, नद्या मंजूर असे सांगत असून बनवाबनवी आणि निवडणुकीसाठी वेगवेगळे फंडे हे त्यांचे वैशिष्ट्य असल्याची उपरोधिक टीका माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी संगमनेरचे लोकप्रतिनिधी पालकमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्यावर केली आहे.
संगमनेर सेवा समितीच्या वतीने नाशिक पुणे रोडवर मार्केट कमिटी समोर जाहीर सभा झाली यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मा.आ. डॉ सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, सौ दुर्गाताई तांबे, रणजीतसिंह देशमुख, विश्वासराव मुर्तडक, दिलीपराव पुंड, डॉ. जयश्रीताई थोरात, सोमेश्वर दिवटे, डॉ. मैथिलीताई तांबे, हिरालाल पगडाल, पप्पू कानकाटे, इसाक खान पठाण, अजय फटांगरे, सौ प्रमिला अभंग, यांच्यासह सेवा समितीचे सर्व उमेदवार व विविध पदाधिकारी उपस्थित होते.