संगमनेर (प्रतिनिधी)--संगमनेर शहर ही सुसंस्कृत शहर आहे .मागील एक वर्षापासून संगमनेरातील दहशत आणि दडपशाही विरुद्ध संगमनेरकर एकवटले असून शिंदे सेनेच्या वतीने आयोजित खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या रॅलीचा फ्लॉप शो झाला असून नागरिकांच्या अनुपस्थितीमुळे रॅली सहसभा रद्द करण्यात झाली आहे.

संगमनेर नगर परिषदेच्या निवडणुकीत प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. लोकनेते बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजित तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर सेवा समितीला संगमनेर शहरातील नागरिकांनी मोठा पाठिंबा दर्शवला आहे.

संगमनेर शहरांमध्ये मागील एक वर्षापासून वाढलेली गुंडागर्दी ,अमली पदार्थांची तस्करी, दडपशाही, दादागिरी, या विरुद्ध संगमनेरकर एकवटले आहे संगमनेरची शांतता सुव्यवस्था व वैभवशाली परंपरा टिकवण्यासाठी तमाम संगमनेरकर एकत्र झाल्याने विरोधी महायुतीची त्रिधात्रीपट उडाली आहे.

शिवसेनेच्या उमेदवारांच्या उमेदवारीवरून शिंदे सेनेमध्ये ही उभी फूट पडल्यानंतर भाजपच्या निष्ठावंतांनी ही बंड पुकारले. लाभोपाठ नागरिकांनी पाठ फिरवल्यानंतर शेवटच्या टप्प्यामध्ये खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांची रॅली आयोजित करण्यात आली.

या रॅलीसाठी खेड्यापाड्यातून युवकांना बोलवण्यात आले. मात्र नागरिकांचा निरुत्साह. आणि युवकांचा सहभाग नसल्याने ही रॅली पूर्णपणे फ्लॉप ठरली. शहरवासी यांचे आणि तालुक्याचे लक्ष लागलेल्या या रॅलीमध्ये नागरिकांनी युवक नसल्याने मध्यावर्ती ठिकाणी रॅली बंद करावी लागली.

याचबरोबर नवीन नगर रोड येथे रॅली ची सांगता आयोजित करण्यात आली होती परंतु उपस्थिती अभावी ही सभा सुद्धा रद्द करावी लागली.

एकूणच संगमनेर शहरांमध्ये डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या रॅलीचा फज्या उडाल्याने शिवसेनेतील वरिष्ठ नेत्यांनी दखल घेत स्थानिक नेत्यांना खडसावले आहे. श्रीकांत शिंदे यांच्या रॅलीच्या फ्लॉप शो झाल्याने संपूर्ण राज्यामध्ये जोरदार चर्चा झाली असून संगमनेर करांनी सौ शहरी एक संगमनेरी दाखवत दादागिरी आणि दडपशाहीला जागा दाखवली आहे.

चौकट

श्रीकांत शिंदे नाराज झाल्याने तडकाफडकी माघारी

शिवसेनेच्या रॅलीमध्ये उपस्थिती नसल्याने वा अत्यंत उदासीनता असल्याने डॉ. श्रीकांत शिंदे हे नाराज झाले असून स्थानिक नेत्यांना त्यांनी चांगले खडसावले याचबरोबर रॅलीतून काढता पाय घेत ते तडका फडकी निघून गेले.