दैनिक आनंद News (प्रतिनिधी)
संगमनेर शहर पोलिस अॅक्शन मोडवर : दुचाकीस्वारांवर कारवाई; २५ हजारांचा दंड वसूल
संगमनेर : संगमनेर शहर पोलिस हे गुरुवारी (ता.१३) चांगलेच ''अॅक्शन मोडवर'' आल्याचे पहायला मिळाले. रस्त्यावर उतरून थेट दुचाकीस्वारांवर ऑनलाइन दंडात्मक कारवाई करत दणका दिला आहे. अपर पोलिस अधीक्षक वैभव कलबुर्मे, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे व पोलिस निरीक्षक रवींद्र देशमुख हे स्वतः मोहिमेत सहभागी होते.
शहरात अनेक ठिकाणी दुचाकीस्वार धूमस्टाईल दुचाकी चालवणे, फॅन्सी नंबरप्लेट बसवणे, ट्रिपलसीट जाणे, लायसन्स, कागदपत्रे नसणे अशा दुचाकीस्वारांवर शासकीय विश्रामगृहासमोर गुरुवारी सकाळी साडेदहा वाजल्यापासून, तर दुपारी जवळपास दीड वाजेपर्यंत पोलिस रस्त्यावर दुचाकीस्वारांना थांबवून कागदपत्रांची तपासणी करत होते. कागदपत्रे नसणाऱ्या अनेक दुचाकीस्वारांवर ऑनलाईन दंडात्मक कारवाई देखील केली आहे.