संगमनेर आता ड्रग्सच्या विळख्यात धोकादायक अवैद्य धंद्यांची नव्याने भर पोलीस कारवाईत २.२३ लाखांच्या मुद्देमाल जप्त     |      लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर मधील वाढलेल्या अमली पदार्थांच्या तस्करीबाबत केली होती चिंता व्यक्त     |      माझी वसुंधरा योजनेअंतर्गत 1.5 कोटींच्या बक्षीस रकमेतून विविध विकासकामे मार्गी - आ.सत्यजीत तांबे     |      संगमनेरमध्ये गुरुवारी भाऊबीज निमित्त रंगणार दिवाळी पहाट गाणी     |      संगमनेर शहरातील रस्त्यांसाठी ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर - आ खताळ     |      ऐतिहासिक शहागडावर दीपावलीनिमित्त मशाल उत्सव साजरा     |      नदीपात्रात वाहून गेलेल्या विजय कुटेचा मृतदेह तब्बल चौथ्या दिवशी सापडला     |      आमदार अमोल खताळ यांच्या हल्ल्या बाबत मंत्री विखे यांनी सातला निशाणा     |      महाराणा प्रताप मंडळाचा नवदुर्गा मंदिर देखावा पहिल्याच दिवसापासून संगमनेरकरांना पाहता येणार आहे     |      शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय महायुतीच्या अजेंड्यावर : उपमुख्यमंत्री शिंदे     |     
चंदनपुरी घाटात ट्रकचे ब्रेक फेल झाल्याने घडला विचित्र अपघात, सात वाहने एकमेकांवर आदळली By Admin 2025-03-29

दैनिक आनंद News (प्रतिनिधी)




चंदनपुरी घाटात ट्रकचे ब्रेक फेल झाल्याने घडला विचित्र अपघात, सात वाहने एकमेकांवर आदळली

संगमनेर - तालुक्यात नाशिक-पुणे महामार्गावर चंदनापुरी घाटात गुरुवारी सायंकाळी एक धक्कादायक अपघात घडला.

ऊस वाहतूक करणाऱ्या एका ट्रकचे ब्रेक फेल झाल्यामुळे हा ट्रक समोरच्या दुसऱ्या ट्रकला जोरात जाऊन धडकला.

धडकेनंतर सात वेगवेगळी वाहनं एकमेकांवर आदळली आणि हा अपघात इतका विचित्र झाला की, पाहणाऱ्यांच्याही अंगावर काटा आला.

सुदैवाने या घटनेत कोणाचा जीव गेला नाही, पण वाहनांचं बरंच नुकसान झालं. या अपघातामुळे काही काळ वाहतूकही खोळंबली.

हा अपघात गुरुवारी सायंकाळी पाचच्या सुमारास घडला. नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावर चंदनापुरी घाटातून एक ट्रक (एमएच ४१ ए क्यू ७३०७) मंचरवरून ऊस घेऊन लोणी प्रवरेकडे निघाला होता.

Special Offer Ad