शिवजयंती उत्सवावरून काँग्रेस-शिवसेनेत वाद
By Admin 2025-03-10
दैनिक आनंद News (प्रतिनिधी)
काँग्रेसकडून मंदिर तर शिवसेनेकडून किल्ला उभारण्याच्या तयारीवरून बस स्थानकावर तणाव .
संगमनेर - तिथीनुसार शिवजयंती उत्सवाची बस स्थानकावर तयारी रविवारी(दि९) सुरू होती. याच वेळी या ठिकाणी दुसऱ्या गटांनी देखावा साजरा करण्याच भूमिका घेतल्याने तणाव निर्माण झाला होता. काँग्रेस आणि शिवसेना कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांमध्ये यावेळी रात्री वाद निर्माण झाला.यामुळे मोठा पोलीस बंदोबस्त घटनास्थळी दाखल झाला. रात्री उशिरा यावर तोडगा निघू शकला नाही.
या याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, तिथीनुसार संगमनेरात शिवजयंती साजरी करण्यात येणार असून त्या दृष्टीने तयारी सुरू करण्यात आहे काँग्रेसच्या वतीने बस स्थानकावर मंदिर उभारण्यात येणार आहे. त्याचे उद्घाटन रविवारी आमदार सत्यजित तांबे यांचे हस्ते झाले. सायंकाळच्या वेळेस याचे काम सुरू असतानाच शिवसेनेकडून याच ठिकाणी किल्ला उभारण्याचा आग्रह धरण्यात आला. दोन्ही बाजूचे कार्यकर्ते जमा झाल्याने घोषणाबाजी करण्यात आली तणाव निर्माण झाला. याची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस हे घटनास्थळी दाखल झाले. उपअधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे, तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक देविदास ढुमणे, संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास भान्सी यांच्यासह मोठा पोलीस पोलीस बंद बंद करण्यात आला. संगमनेर नगर परिषदेचे मुख्याधिकारी रामदास कोकरे आले. पोलिसांसमोरच काँग्रेस आणि शिवसेनेच्या दोन्ही गटात उत्सवावरून वाद सुरू होते. रात्री उशिरापर्यंत बस स्थानकावर पोलिसांसह दोन्ही गट ठाण मांडून बसले होते.