दैनिक आनंद News (प्रतिनिधी)
तालुक्यात २५ गावे, ६१ वाड्यांना २० टँकरद्वारे पाणी
संगमनेरः
संगमनेर तालुक्यात गेल्या आठ-दहा दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे शेतात पाणी साठले आहे. यामुळे ऐन उन्हाळ्यात सध्या पाणी टँकरच्या मागणीला अचानक ब्रेक लागला आहे. सध्या तालुक्यात २५ गावांसह ६१ बाडांना २० टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे.
सर्वत्र अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. अनेक भागात पावसाने अक्षरशः थैमान घातले. संगमनेर तालुक्यातही गेल्या १० दिवसांपासून 'अवकाळी' ने हजेरी लावल्याने शेतात पाणी साठले आहे. पिकांचे नुकसान झाले आहे. तालुक्यातील बऱ्याच भागात अवकाळी पाऊस पडला. समनापूर, बडगाव पान, तळेगाव दिघे, चिंचोली गुरव, निमोण, घुलेवाडी, गुंजाळवाडी, चंदनापुरी, साकुरसह पठार भागातील अनेक गार्वामध्ये अवकाळी पाऊस पडला. तळपत्या मे महिन्यासह उन्हाळ्यात संगमनेर तालुक्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवल्याने दरवर्षी टँकर सुरू असतात. यंदाही टँकर सुरू आहेत, मात्र अचानक 'अवकाळी'ने हजेरी लावल्याने टैंकर मागणीला काही प्रमाणात ब्रेक लागला आहे. तालुक्यातील पिंपळगाव देपा, खंडेरायवाडी,
संगमनेर तालुक्यात काल (सोमवारी) दुपारी ४ वाजेच्या सुमारास अवकाळी पावसाने दमदार बंटींग केली. तब्बल तासभर अवकाळी पाऊस सुरू होता. अनेक गावांमध्ये मुसळधार पाऊस पडल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. शेतांमध्ये पाणी साठले आहे. 'अवकाळी'ची ही अवकळा संपणार तरी कधी, असा सवाल नुकसानग्रस्त शेतकरी उपस्थित करीत आहेत.