नदीपात्रात वाहून गेलेल्या विजय कुटेचा मृतदेह तब्बल चौथ्या दिवशी सापडला     |      आमदार अमोल खताळ यांच्या हल्ल्या बाबत मंत्री विखे यांनी सातला निशाणा     |      महाराणा प्रताप मंडळाचा नवदुर्गा मंदिर देखावा पहिल्याच दिवसापासून संगमनेरकरांना पाहता येणार आहे     |      शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय महायुतीच्या अजेंड्यावर : उपमुख्यमंत्री शिंदे     |      अनबाउंड स्टुडिओचे आर्किटेक जय चौहान यांचा बेंगलोर येथे विशेष पुरस्काराने सन्मान     |      तालुक्याच्या अस्मितेसाठी 25000 नागरिकांचा भव्य विराट मोर्चा     |      संगमनेर शहरात मंगळसूत्र चोरांचा धुमाकूळ सुरूच ! महिलेचे तोंड दाबून मंगळसूत्र पळवले...     |      भंडारदरा धरण भरले, प्रवरा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा     |      यांच्यासारखा नथुराम गोडसे समोर आल्यास, विचार अन् तत्वासाठी आनंदानं बलिदान स्वीकारील'; बाळासाहेब थोरातांचं मोठं विधान     |      संगमनेरात ३००फूट तिरंगा पदयात्रा – हजारो विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग     |     
नागरीकांच्या सतर्कतेमुळे संगमनेर बस स्थानकामध्ये चोरी करणारी महिला पोलिसांच्या ताब्यात By Admin 2025-05-21

दैनिक आनंद News (प्रतिनिधी)




गुन्हा दाखल न केल्याने संताप व्यक्त

संगमनेर : गेल्या अनेक दिवसांपासून घडत आहे. काल मंगळवारी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास चोरी करणारी एका महिला नागरीकांच्या सतर्कतेमुळे पोलिसांच्या ताब्यात दिली आहे. तिने चोरीची कबुली देऊन चोरलेले दागिने देऊन देखील पोलिसांनी तिच्याविरुद्ध गुन्हा दाखल न केल्याने शहरातील नागरीकांमधून संताप व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, संगमनेर बसस्थानकामध्ये वारंवार चोरीच्या घटना घडत आहे. या चोरट्यांना पकडण्यात बस स्थानक परिसरात एक महिला अनेक दिवसांपासून दागिने चोरी करत होती. ही महिला दागिने चोरी करण्यामध्ये सराईत आहे. काल मंगळवारी सकाळी एक महिला चोराने एका महिला प्रवाशाचे मोबाईल, पैसे, दागिने असलेली पर्सची चोरी केली. हा प्रकार वृत्तपत्र विक्रेते व सामाजिक कार्यकर्ते सतीश आहेर व त्यांच्या सहकाऱ्यांना समजताच त्यांनी सदर महिलेला पकडले. त्यांनी त्वरित पोलीस ठाण्यात संपर्क साधूनया महिलेची कल्पना दिली. पोलीस एक तासानंतर संगमनेर बस स्थानकात पोहोचले. त्यानंतर सदर महिलेला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. पोलिसांनी खाक्या दाखविल्यानंतर तिने गुन्हा कबुल करून चोरलेली पर्स परत दिली. संगमनेर बसस्थानकात चोरांच्या टोळ्या राजरोसपणे चोऱ्या करतात. या ठिकाणी सुरक्षेसाठी कोणतीही यंत्रणा नसल्याने त्याचा फायदा घेत चोर मालामाल होत आहे. दरम्यान, या बसस्थानकातून मोठ्या प्रमाणावर प्रवासी प्रवास करीत असतात. त्यात शाळकरी विद्यार्थी, ग्रामीण भागातील महिलांची मोठी संख्या आहे. गेल्या काही दिवसांपासून सकाळी कॉलेजच्या मुलींचे मोबाईल, पर्स रोज चोरी जात होते.

याबाबत पोलिसांना माहिती देऊन देखील कुठलीही दखल घेतली जात नाही. सकाळी पुन्हा एकदा एका मुलीची पर्स चोरी गेली. मात्र, यावेळी चोरटी महिला लक्षात आली. या महिलेने चोरलेली पर्स क्षणात आपल्या मुलीकडे देऊन आपण चोरी न केल्याचा बनाव केला. मात्र, त्याठिकाणी असलेले सतीश आहेर व संतोष मुर्तडक यांनी त्या चोरट्या महिलेला पकडले. तिच्याकडे चौकशी करून देखील ती कबुल झाली नाही. त्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. शहरातील वाढत्या चोऱ्या, पोलिसांची कार्यपद्धती, होत असलेल्या नुकसानीमुळे केवळ बसस्थानक परीसरच नाही तर शहरातील नागरीक संतप्त झाले आहे. नागरीकांनी चोरट्या महिलेस महिलेस पकडूनही पोलिसांनी तिच्याविरुद्ध कारवाई न केल्याने या नागरीकांनी संताप व्यक्त केला आहे.