रघुवीर खेडकर यांना पद्मश्री पुरस्कार हा लोककलावंतांचा सन्मान - माजी मंत्री बाळासाहेब थोरात     |      शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख आप्पासाहेब केसेकर यांचे निधन      |      दिलीपराव पुंड यांना मातृशोक     |      उद्धव ठाकरे शिवसेनेचा रणशंखनाद पंचायत समिती जिल्हा परिषद भगव्याखालीच     |      कोण होणार नगराध्यक्ष ? उत्सुकता शिगेला तीन जागांसाठी शांततेत मतदान     |      घुलेवाडी साठवण तलावातील गौन खनिज बाबत महसूल विभागाचे दुर्लक्ष     |      चंदन चोरी पकडली     |      विधानसभेत खोटे बोलणाऱ्या खताळांविरुद्ध तक्रार दाखल करणार खोटे व्हिडिओ आणि फ्लेक्सबाजी शिवाय वर्षातील एक तरी काम दाखवा     |      आ.सत्यजित तांबे यांच्या पाठपुराव्यातून बिबट्याच्या हल्ल्यातील मयत सिद्धेश कडलगच्या कुटुंबीयांना 10 लाखाची तातडीची मदत     |      बिबट्यापासून दहशतमुक्तीसाठी संगमनेर तालुक्यातील हजारो नागरिक रस्त्यावर     |     
सिंचनापासून वंचित राहिलेल्या सर्व गावांचे होणार सर्वेक्षण By Admin 2025-06-12

दैनिक आनंद News (प्रतिनिधी)




मुंबईतील जलसंपदा मंत्र्यांच्या बैठकी नंतर आ.अमोल खताळ यांची माहिती

संगमनेर प्रतिनिधी

       संगमनेर तालुक्यातील साकूर पठार भागातील दिर्घकाळ प्रलंबित पाणी प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी  मुंबई येथे जलसंपदा मंत्री मा.ना.राधाकृष्ण विखे पा.यांच्या मंत्रालयातील दालनात विशेष बैठक पार पडली.या बैठकीत जल संपदा विभागाने बॅरेज बंधाऱ्यांचा पर्याय समोर आणला आहे. या माध्यमातून साकूर पठारभागाचा पाणी प्रश्न कायमस्वरुपी मार्गी लागणार असून, गेल्या अनेक वर्षांपासून पाण्यावाचून वंचित असलेल्या पठारभागाला दिलासा मिळणार आहे.

   या बैठकीला आमदार अमोल खताळ, भाजपा तालुकाध्यक्ष गुलाब भोसले, भाजप राज्य कार्यकारिणी सदस्य रऊफ शेख,रवी दातीर, अॅड .अमित धुळगंड यांच्यासह शिष्टमंडळ उपस्थित होते. संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील मोरवाडी धरणाच्या संदर्भात अनेक वर्षां पासून या भागातील नागरिकांची मागणी होती. याआधी भूसंपादनही झाले होते, मात्र धरण न झाल्याने जमीन शेतकर्यांना परत देण्यात आली होती. 2004 मध्ये तत्कालीन पाटबंधारे राज्यमंत्री असताना कोणाच्या सांगण्यावरून न्यायालयाला पत्र देऊन जायकवाडीच्याखाली  कुठलेच धरण होणार नाही असे लेखी हमीपत्र राज्य शासनाच्या वतीने दिले गेलेले आहे.परंतु साकुर पठार भागासह तालुक्यातील पाणी प्रश्न कोणत्याही परिस्थिती मध्ये सोडवायचा असल्याने आमदार अमोल खताळ पा.यांनी   यासाठी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे आग्रह धरला आहे,यानुसार  संगमनेर तालुक्याच्या साकुर पठार भागासह तालुक्यातील निमोण  व तळेगाव या सर्व दुष्काळी भागाचे नव्याने सर्वेक्षण करून एक महिन्या च्या आत अहवाल सादर करण्याचे निर्देश जलसंपदामंत्री नामदार राधाकृष्ण विखे पा.यांनी दिल्याची माहिती आमदार अमोल खताळ पा.यांनी दिली आहे.तसेच सर्वेक्षण अहवाल आल्यानंतर पावसाळी अधिवेशनाच्या अगोदर पुन्हा एकदा बैठक घेउन या भागातील पाण्याचा प्रश्न कायम स्वरूपी सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातील असा विश्वास दिला असल्याचे आमदार अमोल खताळ यांनी सांगितले आहे.

 चौकट

    निमगाव भोजापूर धरणाची उंची, पाणी नियोजन, व्यवस्थापन संदर्भातही चर्चा झाली असून, त्यातून पाणी मिळव ण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.निळवंडे डावा व उजवा कालवा, तसेच राहठीचा दरा येथे धरण बांधण्या च्या बाबतही विचार सुरू आहे. “तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत पाणी मिळणारच आहे असा ठाम विश्वास व्यक्त करत  ते म्हणाले की पाण्यापासून वंचित राहणार्या सायखिंडी, कऱ्हे व इतर सर्व गावाचा सर्वे करून भविष्यात एकही गाव पाण्यावाचून राहणार नाही, यासाठी जलसंपदामंत्री विखे पाटील आणि मी स्वतः  प्रयत्नशील राहू असा विश्वास आ अमोल खताळ यांनी व्यक्त केला आहे.

Special Offer Ad