फ्लायओव्हरचे काम नागरिकांनी बंद पाडले, सर्व्हिस रस्त्यावरील खड्डे बुजवण्याची मागणी     |      गटार साफसफाई करताना दोघांचा मृत्यू     |      गटार दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना 50 लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी--आमदार सत्यजित तांबे     |      चंदनापुरी घाटात स्कूल बस पलटी, विद्यार्थी जखमी; वाहतूक व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह     |      संगमनेर पंचायत समितीत थोरात-विखे समर्थक एकमेकांना भिडले, जोरदार घोषणाबाजी करत आरोप-प्रत्यारोप; पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात     |      तर स्वातंत्र्यदिनी सामूहिक आत्मदहन करू !     |      म्हाळुंगी नदीवरील पूल जनतेच्या सेवेसाठी खुला     |      संगमनेर महायुती व आमदार अमोल खताळ युवा मंचाने काढला कॅन्डल मार्च     |      प्रवरानदी पात्रात वाळू चोरी करताना तस्कराला रंगेहात पकडले ! सहा जणांवर गुन्हा दाखल     |      अरुण उंडे संगमनेरचे नवे प्रांताधिकारी     |     
अनिल शिंदे यांना बंधू शोक By Admin 2025-06-12

दैनिक आनंद News (प्रतिनिधी)




रहीमपूर येथील प्रगतशील शेतकरी भिमाजी शिंदे यांचे निधन

संगमनेर ( प्रतिनिधी)---अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे यांचे मोठे बंधू व रहिमपूर येथील प्रगतशील शेतकरी भिमाजी बाबुराव शिंदे यांचे वृद्धापकाळाने निधन झाले आहे. मृत्यू समय त्यांचे वय 82 वर्षे होते.

रहिमपूर येथील प्रगतशील शेतकरी व लोकनेते बाळासाहेब थोरात यांचे खांदे समर्थक भिमाजी बाबुराव शिंदे यांनी सामाजिक व कृषी क्षेत्रामध्ये या परिसरामध्ये उल्लेखनीय काम केले. रहिमपूर गावच्या विविध संस्थांच्या उभारणीमध्ये त्यांचा मोठा वाटा राहिला. अमृतवाहिनी बँकेचे संचालक अण्णासाहेब शिंदे व अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे यांचे ते बंधू होते.

त्यांच्या पश्चात मुलगा प्रा नवनाथ शिंदे, गोरक्षनाथ शिंदे ,तीन मुली, भाऊ सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे.

त्यांच्या निधनाबद्दल महाराष्ट्राचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, इंद्रजीत भाऊ थोरात ,डॉ जयश्रीताई थोरात, सौ दुर्गाताई तांबे यांच्यासह परिसरातील ग्रामस्थ व नागरिकांनी शोक व्यक्त केला आहे.