दैनिक आनंद News (प्रतिनिधी)
पकडलेल्या आरोपींकडून शहरातील तसेच त्यांनी केलेल्या गुन्हेगारी घटनांची माहिती घेतली जात असून पुढील तपास सुरू आहे.
संगमनेर, 12 जूनः
संगमनेर शहर आणि परिसरात वाढत्या लुटमारीच्या घटनांमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना संगमनेर पोलिसांनी मोठा दिलासा दिला आहे. दोन सराईत गुन्हेगारी टोळ्यांना जेरबंद करत पोलिसांनी एकूण सात आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून तब्बल 1,55,500/- किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या कारवाईमुळे शहरातील गुन्हेगारीला आळा बसण्याची आशा निर्माण झाली आहे.सातत्याने घडणाऱ्या गुन्हेगारी घटनांमुळे संगमनेरमधील नागरिक भयभीत झाले होते, पण आता पोलिसांच्या कारवाईमुळे दिलासा मिळाला
असून या धडक कारवाईचं सर्वत्र कौतुक होत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेले सर्व नऊ आरोपी सराईत गुन्हेगार असून साई शरद सूर्यवंशी (वय 20, रा. अकोले नाका, संगमनेर), राहुल भरत सोनवणे (वय 24, रा. अकोले नाका, संगमनेर), आदित्य संपत सूर्यवंशी (वय 27, रा. अकोले नाका, संगमनेर), पिल्या उर्फ विक्रम रामनाथ घोडेकर (वय 27, रा. पंपिंग स्टेशन, संगमनेर), सिद्धार्थ दीपक मावस (वय 22, रा. खांडगाव, संगमनेर), प्रशांत उर्फ परशा दीपक मावस (वय 19, रा. खांडगाव, संगमनेर), सौरभ पप्पू खर्डे (वय 19, गणेशवाडी, रा. खांडगाव, संगमनेर) अशी पोलिसांनी पकडलेल्या दोन्ही टोळीतील आरोपींची नावे आहेतपोलिसांनी पकडलेल्या आरोपींकडून खुनाचा प्रयत्न, दरोडा आणि लुटमार असे गंभीर गुन्हे उघडतेस आले असल्याचे सांगण्यात आले. याशिवाय पकडलेल्या आरोपींकडून रोकड रकमेसह, देवघरातील चार देव, पितळी दिवटे, ताम्हण, तांब्या, ताट असे पूजेचे साहित्य, चाकू, 1 लाख 20 हजार रुपये किमतीच्या दोन दुचाकी, मोबाईल, चॉपर, काठ्या असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे
सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, संगमनेरचे पोलीस उपअधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख, पोलीस उपनिरीक्षक समीर अभंग व संतोष पगारे, पोलीस कॉन्स्टेबल संदीप शिरसाठ, अजित कुहे, संतोष बाचकर, सुरेश मोरे, अतुल उंडे, हरिश्चंद्र बांडे, आत्माराम पवार यांच्यासह पोलीस उपअधीक्षकांच्या पथकातील पोलीस नाईक राहुल डोके, पोलीस कॉन्स्टेबल राहुल सारबंदे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.