रघुवीर खेडकर यांना पद्मश्री पुरस्कार हा लोककलावंतांचा सन्मान - माजी मंत्री बाळासाहेब थोरात     |      शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख आप्पासाहेब केसेकर यांचे निधन      |      दिलीपराव पुंड यांना मातृशोक     |      उद्धव ठाकरे शिवसेनेचा रणशंखनाद पंचायत समिती जिल्हा परिषद भगव्याखालीच     |      कोण होणार नगराध्यक्ष ? उत्सुकता शिगेला तीन जागांसाठी शांततेत मतदान     |      घुलेवाडी साठवण तलावातील गौन खनिज बाबत महसूल विभागाचे दुर्लक्ष     |      चंदन चोरी पकडली     |      विधानसभेत खोटे बोलणाऱ्या खताळांविरुद्ध तक्रार दाखल करणार खोटे व्हिडिओ आणि फ्लेक्सबाजी शिवाय वर्षातील एक तरी काम दाखवा     |      आ.सत्यजित तांबे यांच्या पाठपुराव्यातून बिबट्याच्या हल्ल्यातील मयत सिद्धेश कडलगच्या कुटुंबीयांना 10 लाखाची तातडीची मदत     |      बिबट्यापासून दहशतमुक्तीसाठी संगमनेर तालुक्यातील हजारो नागरिक रस्त्यावर     |     
म्हाळुंगी नदीवरील पूल जनतेच्या सेवेसाठी खुला By Admin 2025-06-16

दैनिक आनंद News (प्रतिनिधी)




आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते झाले लोकार्पण शालेय विद्यार्थी आणि नागरिकांची झाली गैरसोय दूर

संगमनेर (प्रतिनिधी)- शहरातील अत्यंत महत्त्वाचा असणारा स्वामी समर्थ नगर ते संतोषी माता मंदिर दरम्यानचा म्हाळुंगी नदीवरील पूल जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसाचेऔचित्य साधत  जनतेसाठी खुला करण्यात आला आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते या पुलाचे लोकार्पण करण्यात आले. शाळा सुरू होण्याच्या पूर्वसंध्येला हा पूल वाहतुकीसाठी खुला झाल्याने विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

 चार वर्षांपूर्वी हा पूल कोसळला होता यामुळे विद्यार्थी व नागरिकांची मोठी  गैरसोय झाली होती. या पुलाचे काम करावे यासाठी स्थानिक नागरिकांनी अनेकदा आंदोलने केली. यानंतर या पुलाच्या कामास सुरुवात झाली होती.  या पुलाचे काल लोकार्पण  करण्यात आले. यावेळी बोलताना  अमोल खताळ म्हणाले की, पूर्वी या पुलाचे बांधकाम स्वर्गीय बाळासाहेब विखे पाटील यांच्या निधीतून झाले होते. काही वर्षांपूर्वी एका ठेकेदाराच्या हल गर्जीपणामुळे हा पूल कोसळला होता. त्यानंतर महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी तत्कालीन महसूल मंत्री आणि विद्यमान जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे निधीसाठी पाठपुरावा केला. यामुळे दोन वर्षांपूर्वी, त्यांच्या वाढदिवसा च्या दिवशी, या पुलाच्या नव्या कामास मंजुरी मिळाली होती. विशेष म्हणजे, त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशीच या नव्या पुलाचे लोकार्पणही झाले, हा एक सकारा त्मक योगायोग ठरला असल्याचे आमदार  खताळ यांनी सांगितले.                      म्हाळुंगी नदीचा पूल पडला असल्याने अनेक वर्षांपासून विद्यार्थ्यांना होणाऱ्या त्रासातून मुक्ती मिळाली आहे. आमदार खताळ यांनी दोन वेळा या पुलाचीपाहणी करून ठेकेदारांना दर्जेदार कामासाठी सूचना दिल्या होत्या. अल्पावधीत हे बांधकाम पूर्ण करून नागरिकांसाठी पूल खुला करण्यात आला. 

Special Offer Ad