संगमनेर संगमनेर नगरपालिकेची निवडणूक जाहीर झाल्यापासून महायुती व महाविकास आघाडीत अंतर्गत धुसफूस सुरू झाली आहे. यातच नव्या जुन्यांचा बाद उफाळून आल्याने अर्ज दाखल करण्यापूर्वीच सर्वच राजकीय पक्षांनी संभाव्य धोका टाळण्यासाठी स्वतंत्र लढण्याची तयारी सुरू केली आहे. दरम्यान, निवडणूक रंगात येताना, आता माजीमंत्री बाळासाहेब थोरात व पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष आहे.
गेल्या चार वर्षापासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या होत्या. मात्र निवडणूक आयोगाने नगर परिषदेच्या निवडणुकीचा कार्यक्रम दि. ४ तारखेला जाहीर केला. यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून बाट पाहणारे इच्छुक उमेदवार थेट मैदानात उतरले, संगमनेर शहरात महायुती, महाविकास आघाडी, स्थानिक विकास आघाडी, शहर विकास आघाडी की पक्ष, यावर काहीच हालचाल अद्याप सुरू झाली नाही. यामुळे पदाधिकारी, कार्यकर्ते व इच्छुकही नाराज झाले आहे. यात नगराध्यक्ष पद महिला राखीय असल्याने सर्वच मुख्य राजकीय पक्षांनी त्यावर दावा सांगितला आहे. सत्तेचा मोह सुटणे अवघड असल्याने संभाव्य चोका टाळण्यासाठी राजकीय पक्षांनी व इच्छुकांनी स्वतंत्र तयारी सुरू केली आहे.माजीमंत्री बाळासाहेब
थोरात आता उमेदवारी देताना काय भुमिका घेतात,
मविआतील घटक पक्षांना कसा न्याय देतात, तसेच माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे कशाप्रकारे निवडणुकीलासामोरे जातात. यावर निवडणुकीची खरी दिशा ठरणार आहे. अनेकांना उमेदवारीचे बाशिंग बांधले गेले आहे. तर काहींनी प्रभागात गाठीभेटी घेऊन प्रचाराची रंगीत तालिमही सुरू केली आहे. महायुती व महाविकास आघाडीला निवडणुका नेमक्या कशा लढवायच्या, यानाचत बरिष्ठ पातळीवरून कुठल्याच प्रकारच्या सूचना मिळालेल्या नाहीत. त्यामुळे घटक पक्षांमध्ये अस्वस्थता वाढली आहे. आता उमेदवारी नेमकी कोणाकडून करायची, असा प्रश्न इच्छुकांसमोर निर्माण झाला आहे.
जागा वाटपाचा तिढा; सत्तेसाठी स्वतंत्र लढा
महाविकास आघाडीत काँग्रेस, शिवसेना उबाठा है दोन पक्ष सोडले तर इतर दखल घेण्यासारखे नाही. यामुळे काँग्रेसला रान मोकळे असून ते शिवसेना उबाठाला फारसे महत्व देत नाही. तर महायुतीत भाजपा, राष्ट्रवादी अजित पवार गट, शिवसेना शिंदे गट, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट हे असले तरी भाजपा व शिवसेना है दोनय पक्ष नगरपालिका निवडणुकीसाठी मैदानात उतरले आहे. यात राष्ट्रवादी व आठवले गटाचे काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. यातच महायुतीत संगमनेर निवडणूक संदर्भात कसलीच चर्चा अथवा बैठक झाली नाही. आमदार अमोल खताळ यांची पालिकेची पहिलीच निवडणूक आहे. शिवसेनेकडून इच्छुकांची संख्या अधिक असून सर्वांची मनधरणी करताना आमदार खताळ यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी खासदार सुजय विखे
पाटिल यांनी अद्याप संगमनेर नगरपालिका निवडणुकीचाचत भुमिका स्पष्ट केली नाही.
निवडणुकीसाठी वेळ कमी असताना कुठल्याच पक्षात एकसुत्री दिसत नाही. यातच उमेदवारीवरुन नवे जुने हा बाद आणखीच वाढला आहे. १५ प्रभागात ३० नगरसेवक आहे. यात महिलाची संख्या १५ असल्याने अनेक माजी नगरसेवकांनी नाराजी टाळण्यासाठी सौभाग्यवतींना मैदानात उत्तरविण्यासाठी पक्षाकडे मागणी केली आहे. माजी नगरसेवक व नगरसेविकांना कसे सामावून घ्यायचे हा मोठा प्रक्ष पक्षातील म्होरक्यांना पडला आहे. तर अनेक तरुण नवीन चेहन्यांनी स्वतःच उमेदवारी जाहीर करून फिक्स नगरसेवक म्हणुन फ्लेक्सचाजी केली. तर दुसरीकडे मात्तबर माजी नगरसेवक दिलीप पुंड, बाळासाहेब पवार, किशोर पवार, गजेंद्र अभंग, नितीन अभंग, किशोर टोकसे, लाला बेपारी यांना काँग्रेसnकशी साद घालणार, हाही प्रश्न आहेच. भाजपाचे अॅड. श्रीराम गणपुले, ज्ञानेश्वर करें, जावेद जहागिरदार यांना कसे सामावून घ्यायचे, तर शिवसेना उबाठा गटाचे संजय फड, अॅड. दिलिप साळगट, अमर कतारी, पप्पू कानकाटे, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार, तालुकाध्यक्ष आबासाहेब थोरात, रिपब्लिकन पार्टी आठवले गट कोणती भूमिका घेतात, याकडे लक्ष आहे.
एमआयएम देखील मैदानात उतरणार
एमआयएम हा पक्ष देखील संगमनेर नगरपालिका निवडणुकीत आपले नशिब आजमावत आहेत. मुस्लिम मतदारांची भूमिका देखील महत्त्वाची ठरणार असून ओबीसी पॅटर्न देखील पालिका निवडणुकीसाठी संवेदनशील बनला आहे. यामुळे राजकीय पक्ष व उमेदवारांसाठी ही डोकेदुखी ठरणार आहे

