दैनिक आनंद News (प्रतिनिधी)
सतत खोटं बोलणाऱ्या ढोंगी लोकांना संगमनेरचा विकास दिसत नाही
संगमनेर ( प्रतिनिधी ) लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी शहरासाठी सातत्याने निधी आणला हायटेक बस स्थानकासह विविध इमारती उभारल्या. नागरिकांना स्वच्छ व शुद्ध मुबलक पाणी दररोज मिळत आहे,दर्जेदार रस्ते आहे,चांगल्या सुविधा आहेत. विकासाचे सर्व मापदंड पूर्ण केले असून काय केले नाही ते सांगा असा सवाल विचारताना विरोधक ढोंगी असून त्यांना संगमनेरचा विकास दिसत नाही ते सातत्याने खोटे बोलतात अशी परखड टीका माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांनी केले असून शांत संयमी असलेले डॉ सुधीर तांबे हे पहिल्यांदा कडाडलेले जनतेने पाहिले.
संगमनेर सेवा समितीच्या वतीने आयोजित जाहीर सभेत मा.आ.डॉ.सुधीर तांबे यांनी विरोधकांवर टीका केली. यावेळी व्यासपीठावर लोकनेते बाळासाहेब थोरात आमदार सत्यजित तांबे, सौ.दुर्गाताई तांबे, डॉ.जयश्रीताई थोरात, दिलीपराव पुंड, विश्वासराव मुर्तडक,रणजीतसिंह देशमुख, सोमेश्वर दिवटे, हिरालाल पगडाल, इसाक खान पठाण अजित ओरा यांसह सर्व उमेदवार उपस्थित होते.