रघुवीर खेडकर यांना पद्मश्री पुरस्कार हा लोककलावंतांचा सन्मान - माजी मंत्री बाळासाहेब थोरात     |      शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख आप्पासाहेब केसेकर यांचे निधन      |      दिलीपराव पुंड यांना मातृशोक     |      उद्धव ठाकरे शिवसेनेचा रणशंखनाद पंचायत समिती जिल्हा परिषद भगव्याखालीच     |      कोण होणार नगराध्यक्ष ? उत्सुकता शिगेला तीन जागांसाठी शांततेत मतदान     |      घुलेवाडी साठवण तलावातील गौन खनिज बाबत महसूल विभागाचे दुर्लक्ष     |      चंदन चोरी पकडली     |      विधानसभेत खोटे बोलणाऱ्या खताळांविरुद्ध तक्रार दाखल करणार खोटे व्हिडिओ आणि फ्लेक्सबाजी शिवाय वर्षातील एक तरी काम दाखवा     |      आ.सत्यजित तांबे यांच्या पाठपुराव्यातून बिबट्याच्या हल्ल्यातील मयत सिद्धेश कडलगच्या कुटुंबीयांना 10 लाखाची तातडीची मदत     |      बिबट्यापासून दहशतमुक्तीसाठी संगमनेर तालुक्यातील हजारो नागरिक रस्त्यावर     |     
सत्यजीत तांबेंचा 'हिसका', उपनिबंधक जाधवांची उचलबांगडी By Admin 2025-12-10

दैनिक आनंद News (प्रतिनिधी)




इंदिरा नगरमधील ७७२ नागरिकांच्या आरक्षणाचा प्रश्न मिटला

संगमनेर ( प्रतिनिधी ) संगमनेरच्या इंदिरा नगरमधील रहिवाशांच्या घरांच्या नोंदीचा अनेक वर्षांपासून रेंगाळलेला प्रश्न अखेर निकाली निघाला आहे. आमदार सत्यजीत तांबे यांनी विधान परिषदेत प्रशासनाला धारेवर धरताच महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी संगमनेरचे उपनिबंधक (सब-रजिस्ट्रार) जाधव यांच्यावर तत्काळ कारवाईचे आदेश दिले आहेत. तांबेंच्या या आक्रमक पवित्र्यामुळे इंदिरा नगरमधील सुमारे ७७२ नागरिकांच्या 'पोकळी हिस्से' नोंदीचा मार्ग मोकळा झाला असून, प्रशासन आता तीन दिवसांच्या अल्टिमेटमवर कामाला लागले आहे.

नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात आमदार सत्यजीत तांबे यांनी संगमनेर येथील सर्व्हे नंबर १०६ मधील ६० ते ६५ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मालमत्ता नोंदीचा प्रश्न लक्षवेधीच्या माध्यमातून अत्यंत पोटतिडकीने मांडला. उपनिबंधक कार्यालयातील अधिकारी जाधव हे सर्वसामान्यांशी अरेरावीने वागत असून कायदेशीर नोंदी करण्यास राजकीय हेतूने किंवा जाणीवपूर्वक टाळाटाळ करत असल्याची गंभीर बाब त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. अधिकाऱ्यांच्या या मुजोर वर्तनावर तांबे यांनी सभागृहात संताप व्यक्त केला.

Special Offer Ad