नदीपात्रात वाहून गेलेल्या विजय कुटेचा मृतदेह तब्बल चौथ्या दिवशी सापडला     |      आमदार अमोल खताळ यांच्या हल्ल्या बाबत मंत्री विखे यांनी सातला निशाणा     |      महाराणा प्रताप मंडळाचा नवदुर्गा मंदिर देखावा पहिल्याच दिवसापासून संगमनेरकरांना पाहता येणार आहे     |      शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय महायुतीच्या अजेंड्यावर : उपमुख्यमंत्री शिंदे     |      अनबाउंड स्टुडिओचे आर्किटेक जय चौहान यांचा बेंगलोर येथे विशेष पुरस्काराने सन्मान     |      तालुक्याच्या अस्मितेसाठी 25000 नागरिकांचा भव्य विराट मोर्चा     |      संगमनेर शहरात मंगळसूत्र चोरांचा धुमाकूळ सुरूच ! महिलेचे तोंड दाबून मंगळसूत्र पळवले...     |      भंडारदरा धरण भरले, प्रवरा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा     |      यांच्यासारखा नथुराम गोडसे समोर आल्यास, विचार अन् तत्वासाठी आनंदानं बलिदान स्वीकारील'; बाळासाहेब थोरातांचं मोठं विधान     |      संगमनेरात ३००फूट तिरंगा पदयात्रा – हजारो विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग     |     
लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्यामुळे इंद्रायणी तांदळाला जागतिक मागणी By Admin 2025-02-28

दैनिक आनंद News (प्रतिनिधी)




कृषिमंत्री पदाच्या काळात इंद्रायणी तांदळाचा वाण विकसित

संगमनेर ( प्रतिनिधी ) काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी 2004 ते 2010 या सहा वर्षाच्या काळात महाराष्ट्राचे कृषिमंत्री पद सांभाळले. या कार्यकाळात महाराष्ट्र सर्वाधिक कृषी उत्पादन करणारे राज्य बनले तर तत्कालीन कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली विकसित झालेल्या इंद्रायणी तांदुळाला आता जागतिक स्तरावर मोठी मागणी वाढली आहे.

सुदर्शन निवासस्थानी शिवाई ऍग्रो इंडस्ट्रीज कंपनीने सुरू केलेल्या केशर पिस्ता इंद्रायणी तांदूळ या वाणाचा विक्री शुभारंभ करण्यात आला.यावेळी राम तळेकर, रणजीतसिंह देशमुख व तांदूळ उत्पादक शेतकरी उपस्थित होते.

लोकनेते बाळासाहेब थोरात यांची शेतकऱ्यांचे नेते म्हणून महाराष्ट्रात ओळख आहे. स्वर्गीय विलासराव देशमुख यांचे अत्यंत विश्वासू सहकारी असलेले बाळासाहेब थोरात यांनी कृषिमंत्री पद मागून घेतले. व या खात्यामध्ये अमुलाग्र बदल घडवले. विद्यापीठे शेतकऱ्यांच्या बांधावर नेली संशोधनाला प्रोत्साहन दिले. सिंचन व्यवस्थेत वाढ करताना एक लाख शेततळ्यांची निर्मिती केली. शिवार फेरी, महापिक अभियाना सह विविध उपक्रम राबविले. याच कार्यकाळात देशाची कृषिमंत्री म्हणून ज्येष्ठ नेते शरदचंद्रजी पवार तर राज्यात कृषिमंत्री म्हणून लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी कृषी क्षेत्रात घेतलेले निर्णय आणि केलेले काम हे कृषी क्षेत्रातील ऐतिहासिक काम ठरले. याच कार्यकाळात महाराष्ट्र सर्वाधिक कृषी उत्पादन करणारे देशातील पहिल्या क्रमांकाचे राज्य ठरले.

शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये बदल झाला. बी बियाणे याबरोबर विविध शेती उत्पादनांमध्येही बदल झाला याच कार्यकाळात स्वच्छ इंद्रायणी तांदूळ विकसित झाला. आज इंद्रायणी तांदूळ हा महाराष्ट्राची ओळख मला असून त्याला जागतिक स्तरावर मोठी मागणी आहे. या तांदळामुळे शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण झाला असून याचे सर्व श्रेय तत्कालीन कृषिमंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांना असल्याचे तांदूळ उत्पादक व शिवानी ॲग्रो चे संचालक राम तळेकर यांनी सांगितले.

याप्रसंगी लोकनेते थोरात म्हणाले की, भारत हा कृषिप्रधान देश असून शेतीमध्ये व्यावसायिकता आणणे गरजेचे आहे. नवीन तरुण पिढी कृषी व्यवसायात आली आहे. कमी वेळ, कमी श्रम व कमी पाण्यामध्ये चांगले उत्पादन शेतकरी घेऊ लागले आहेत. फळबागा फुल शेती व नगदी पिकांची संख्या वाढली असून यामुळे शेती व्यवसायात नक्कीच मोठी समृद्धी निर्माण झाली असल्याचे ते म्हणाले.

याप्रसंगी इगतपुरी परिसरातील तांदूळ उत्पादक शेतकऱ्यांनी तत्कालीन कृषिमंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव केला.